पंचायत समिती पंढरपूरची आमसभा 27 फेब्रुवारी रोजी आयोजित

पंचायत समिती पंढरपूरची आमसभा 27 फेब्रुवारी रोजी आयोजित

पंढरपूर ,दि.24:-पंचायत समिती पंढरपूर सन 2024-25 ची आमसभा गुरुवार दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता पंढरपूर पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे, असे पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशिल संसारे यांनी कळविले आहे.

सदरची आमसभा आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार समाधान आवताडे,आमदार राजु खरे तसेच आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली आहे.

या आमसभेसाठी प्रत्येक विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहितीही गटविकास अधिकारी सुशिल संसारे यांनी दिली.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading