भारतीय सैन्याला विजयासाठी पंढरपूरमध्ये सकल मुस्लिम समाजाच्या वतीने दुवा अदा
भारतीय सैन्याला विजयासाठी पंढरपूरमध्ये सकल मुस्लिम समाजाच्या वतीने दुवा (प्रार्थना) अदा करण्यात आली…

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०५/२०२५- सुरु असलेल्या भारत पाकिस्तान युध्दामध्ये पंढरपूर येथील मुर्शिद बाबा दर्गा येथे भारतीय सैन्याला यश मिळावं तसेच पहलगाम येथे निष्पाप बळी गेलेले जे बांधव आहेत त्यांच्या कुटुंबियांना सावरण्यासाठी तसेच पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या आणि नागरिकांच्या कुटुंबियांना देखील बळ मिळावं म्हणून प्रार्थना करण्यात आली.तसेच पाकिस्तान विरोधात घोषणा देण्यात आल्या.पाकिस्तान सातत्याने काढत असलेल्या कुरापतींमुळे सिमाभागातील नागरिकांना दहशतीखाली जगावं लागत आहे त्यामुळे पाकिस्तानचा निषेध करण्यात आला.

यावेळी पंढरपूर शहर मक्का मजीदचे पेशइमाम सईदभाई सय्यद,शफी मुलाणी, निसार शेख, इम्रान मणेरी,सलीम सय्यद, मुसेब बागवान, जमीर सय्यद, मुन्ना बागवान, बशीर शेख, शकील मुलाणी व पंढरपूर शहरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
