शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने डॉ निलम गोऱ्हे यांचा जोरदार निषेध
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-शिंदे गटाच्या नेत्या आ.डॉ निलम गोऱ्हे यांनी जे विधान केले त्यांच्या विधानाची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ,जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या आदेशाने निलम गोऱ्हे यांच्या प्रतिमेस तहसील कार्यालया समोर जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी निषेधाच्या घोषणा देऊन डॉ.निलम गोऱ्हे यांच्या प्रतिमेस महिला आघाडीने जोडे मारो आंदोलन करत निषेध नोंदवून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात शिंदे गटाच्या नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी नुकतेच आमचे श्रद्धास्थान आसणार्या मातोश्रीवर व उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बेछूट आरोप केले असून त्यांनी केलेल्या विधानाची चौकशी करून त्यांच्या वर कारवाई करण्यात यावी कारण त्यांनी केलेल्या विधानामुळे तमाम शिव सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पंढरपूर शहर व तालुक्याच्यावतीने आम्ही जाहीर निषेध नोंदवत असून डॉ नीलम गोऱ्हे यांच्या विधानाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख बंडू घोडके ,जेष्ठ शिवसैनिक काका साहेब बुराडे, उपतालुकाप्रमुख उत्तम कराळे,नागेश रितुंड, युवराज गोमेवाडीकर ,इंद्रजीत गोरे, नामदेव चव्हाण,किरण सुरवसे ,जालिंदर शिंदे,मनोज शिंदे,बाळासाहेब देवकर,नितीन थिटे,विजय जाधव,नवनाथ रितुंड,अतिश खुळपे, अजिंक्य गोसावी,सचिन खुटाळे,भैय्या पवार, मंजूळाताई दोडमिशे, अनिताताई आसबे,ई रेहना भाभी, शरीफा पठाण,हनुमंत जाधव, कुसुमडे पैलवान आदी उपस्थित होते.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
