महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे सन 2024 चे दर्पण पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे सन 2024 चे दर्पण पुरस्कार जाहीर पोंभुर्ले / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.17/05/2024 : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्‍या 32 व्या राज्यस्तरीय दर्पण पुरस्कारांची घोषणा आज संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, पोंभुर्ले ग्रामपंचायत,जांभे – देऊळवाडी ग्रामस्थ, जांभेकर…

Read More

क्रेडाई पंढरपूरच्या वतीने बांधकाम व्यावसायिकांसाठी चर्चासत्राचे आयोजन

पंढरपुरात भरणार क्रेडाई बांधकाम व्यवसायिकांचा मेळावा क्रेडाई पंढरपूरच्या वतीने पंढरपूरमध्ये चर्चासत्राचे आयोजन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१७ : देशातील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना क्रेडाईच्या पंढरपूर शाखेच्या वतीने शनिवारी ता.१८ रोजी पंढरपूर मध्ये राज्यभरातील विविध शहरातील बांधकाम व्यावसायिकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. येथील धनश्री हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रामध्ये लहान शहरातील बांधकाम व्यवसाय, त्यातील आव्हाने, समस्या…

Read More

नागरी हिवताप योजना मलेरिया विभाग पंढरपूर नगरपरिषद यांच्यामार्फत राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा

नागरी हिवताप योजना मलेरिया विभाग पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर यांच्या कार्यालयामार्फत राष्ट्रीय डेंग्यू दिवस १६ मे साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –दि.१६/०५/२०२४ रोजी नागरी हिवताप योजना मलेरिया विभाग पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर यांच्या कार्यालयामार्फत राष्ट्रीय डेंग्यू दिवस १६ मे साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून प्रभात फेरीचे व कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाव्दार चौक,श्री विठ्ठल रुक्मिणी…

Read More

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची धडक मोहीम

पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची धडक मोहीम पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०५/२०२४- घाटकोपर मुंबई येथे झालेल्या होर्डिंग्जच्या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने आपत्कालीन व्यवस्थापन बाबत मीटिंग आयोजित केली होती. या झालेल्या मीटिंगमध्ये ज्या ज्या शहरांमध्ये अनाधिकृत होर्डिंग्ज असतील त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज पंढरपूर नगरपालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी…

Read More

77 व्या कान चित्रपट महोत्सवामधील भारत पॅव्हेलियनचे उद्‌घाटन

77 व्या कान चित्रपट महोत्सवामधील भारत पॅव्हेलियनचे उद्‌घाटन नवी दिल्ली/PIB Mumbai,15 मे 2024- कान महोत्सव, 15 मे 2024: फ्रान्स येथील 77 व्या कान चित्रपट महोत्सवाच्या विविध विभागांमधील अधिकृत निवडीमुळे भारतासाठी हे वर्ष जादूमय ठरले असून, आज या महोत्सवातील भारत पॅव्हेलियनचे उद्‌घाटन करण्यात आले. दर वर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या कान चित्रपट महोत्सवात भारत सरकारच्या माहिती…

Read More

दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे निर्दाेषत्व सिद्ध

दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे निर्दाेषत्व सिद्ध सनातन संस्थेचे साधक निर्दाेष मुक्त पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज- आज डॉ.दाभोलकर हत्या प्रकरणी न्यायालयाच्या निकालाचा आम्ही सन्मान करतो. या निकालानुसार सनातनचे साधक निर्दाेष होते हेच आज सिद्ध झाले आहे. सनातन संस्था हिंदु आतंकवादी असल्याचे सिद्ध करण्याचे अर्बन नक्षलवाद्यांचे षड्यंत्र विफल झाले आहे.पुणे सी.बी.आय.विशेष न्यायालयाने सनातन संस्थेचे साधक विक्रम भावे…

Read More

पालखी मार्गावरील कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत-प्रांताधिकारी सचिन इथापे

पालखी मार्गावरील कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत-प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13:- आषाढी यात्रेसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भावीक चालत येतात.पायी पालखी सोहळ्या बरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गावरील सेवा रस्त्याची दुरुस्ती, महामार्गावरील…

Read More

शिवबा काशिद, जिवाजी महाले महापुरुषाचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहीण्याजोगा – प्रा.श्रीमंत कोकाटे

नाभिक समाजातील शिवबा काशिद, जिवाजी महाले महापुरुषाचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहीण्याजोगा – प्रा.श्रीमंत कोकाटे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- जेवढा आदर आणि श्रध्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठायी असली पाहिजे तेवढा आदर आणि श्रध्दा शिवबा काशिद आणि जिवाजी महाले यांच्या विषयी असली पाहिजे.भेदभाव करण्याचा कुणालाही अधिकार नाही कारण या महापुरुषांनी बलिदान दिले त्याग केला आहे. त्यामुळे नाभिक समाजातील…

Read More

वारकरी सांप्रदाय व भागवत धर्माचे विचार लहानपणापासून मनावर कोरले तर सुसंस्काराची बीजे मिळून ही मुले सुसंस्कारशील झाल्याशिवाय राहणार नाहीत

वाडीकुरोली येथे वारकरी बाल संस्कार शिबिराचा शुभारंभ वाडीकुरोली/ज्ञानप्रवाह न्यूज –वाडीकुरोली ता.पंढरपूर येथे वारकरी बाल संस्कार शिबिराचा शुभारंभ वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांच्या हस्ते संपन्न झाला.दि.10 मे ते 25 मे या कालावधीत हे शिबिर संपन्न होणार आहे. यावेळी हभप दिलीप मोरे महाराज, सुदाम मोरे, धनंजय गुरव महाराज, राहुल फडतरे, वेदांत राकुंडे, वाडीकुरोलीचे…

Read More

समाजातील प्रत्येकाने आंतरजातीय विवाह ऐवजी अंतरशाखीय विवाहाला प्राधान्य द्यावे- हेमंत कुलकर्णी

ब्राह्मण समाजातील सर्वांनी शाखा भेद विसरून अविवाहित मुले मुलींच्या लग्नासाठी प्रयत्न करावेत परांडा /ज्ञानप्रवाह न्यूज – ब्राह्मण समाजातील सर्वांनी शाखा भेद विसरून होतकरू तरुण-तरुणीच्या अविवाहित मुले मुलींच्या लग्नासाठी प्रयत्न करावेत. समाजातील प्रत्येकाने आंतरजातीय विवाह ऐवजी अंतरशाखीय विवाहाला प्राधान्य द्यावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंढरपूर वधू वर सूचक मंडळाचे प्रमुख हेमंत कुलकर्णी यांनी राज्यस्तरीय…

Read More
Back To Top