नंदुर सब स्टेशनचे काम संथ गतीने करणाऱ्या ठेकेदारास ब्लॅक लिस्ट ला टाका- आ. समाधान आवताडे

नंदुर सब स्टेशनचे काम संथ गतीने करणाऱ्या ठेकेदारास ब्लॅक लिस्ट ला टाका- आ.समाधान आवताडे

मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०४/२०२५ – मंगळवेढा पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा पावसाळ्यात अखंडीत राहावा यासाठी मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावित तसेच नंदुर सब स्टेशनचे काम संथ गतीने सुरू असल्याने सदर ठेकेदारास ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील महावितरणच्या विविध विकास कामे अडचणीच्या संदर्भात आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा येथे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर दिनांक 28 रोजी बैठक घेतली. या बैठकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात महावितरण ची सुरू असलेली विविध विकास कामासंदर्भात यांच्या आढावा घेण्यात आला.

यावेळी पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी आर डी एस एस, डीपीडीसी, घरगुती वीजजोड,आदी सुरू असलेल्या व नवीन विकास कामांची माहिती दिली. त्यावेळी आ.समाधान आवताडे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात आरडीएसएस मधून कोट्यावधीची कामे सुरू आहेत परंतु ही कामे संथ गतीने होत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना,ग्राहकांना बसत आहे. तसेच सबस्टेशन मधील मंजूर वाढीव क्षमतेचे ट्रांसफार्मर बसवण्यास विलंब होत असल्याचे सांगून नवीन डीपी, नवीन लाईन ची कामे वेगाने पूर्ण करावी. मंगळवेढा शहरात एखाद्या ठिकाणी फॉल्ट झाल्यानंतर संपूर्ण शहरातील विद्युत पुरवठा खंडित होतो त्यामुळे मंगळवेढा शहर बंद न राहण्यासाठी शहराचे विविध झोन करून त्यानुसार विद्युत पुरवठा व्हावा तसेच अनेकांच्या घरावरून, घराला चिटकुन विद्युत तारा गेलेल्या आहेत त्यामुळे धोका होण्याचा संभव असल्याने त्या तारा,पोल शिफ्ट करावेत,शहरात व ग्रामीण भागात अनेक वेळा मेंटेनन्सची कामे न केल्यामुळे विद्युत पुरवठा बंद राहतो.मेंटेनन्स ची कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करून विद्युत पुरवठा खंडित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पंढरपूर शहरातील अंडरग्राउंड केबल चे काम तातडीने पूर्ण करावीत.धोकादायक पोल, वारंवार तुटणाऱ्या तारा,अडथळा आणणारी झाडे याबाबत लक्ष देऊन पंढरपूर व मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागातील मान्सूनपूर्व व मान्सून काळात मेंटेनन्स ची कामे तातडीने हाती घ्यावीत.पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात नवीन सबस्टेशन होण्यासाठीचे प्रस्ताव द्यावेत,शेतकरी,वीजग्राहक यांचे जळलेले डिपी वेळेत द्यावेत.काही दिवसात पावसाळ्याला सुरुवात होणार असल्याने महावितरण ची यंत्रणा सज्ज ठेवून अखंडित पुरवठा देण्यासाठी तत्पर राहण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी दिल्या.

यावेळी कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात मंजूर झालेली विकास कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.या बैठकीच्या वेळी कार्यकारी अभियंता विजय पाटील,उपकार्य कार्यकर्ता महेश शीपुरे, महापारेषण चे कार्यकारी अभियंता रवींद्र घुगाटे, उपकार्यकारी अभियंता ओंकार पवार, शाखा अभियंता प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading