१०० दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग

१०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला -महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

रायगड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टी व संकल्पनेतून शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी राबविलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणवाडी सेविकेची, प्रत्येक लाभार्थिनीची आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची कर्तव्यनिष्ठा आहे. सर्व सहकारी, महिला व बालविकास विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, महिला व बाल विकास आयुक्त श्रीमती नयना गुंडे, जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या योगदानाने हे उद्दिष्ट गाठता आले असल्याचे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading