लाडक्या बहिणींच्या शक्ती सोबत आंबेडकरी जनतेच्या भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

लाडक्या बहिणीच्या शक्ती सोबत आंबेडकरी जनतेच्या भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23 – महाराष्ट्रात महायुती चा महाविजय झाला आहे. राज्यात लाडक्या बहिणींची शक्ती,सर्व समाज घटकांचा कौल महायुतीला मिळाला. त्या सोबत दलित बौद्ध आंबेडकरी जनतेने महायुतीला भरघोस मतदान केल्यामुळे महायुती चा ऐतिहासिक विजय झाला आहे. नरेंद्र मोदींनी केलेला देशाचा विकास; त्यामुळे दिसत आहे महायुतीच्या विजयाचा विकास; आज आम्हाला दिसत आहे.

निळ निळ आकाश
महाविकास आघाडी झाली आहे भकास अशी चारोळी सादर करीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या ऐतिहासिक विजयाचे स्वागत केले आहे.महायुतीच्या सराव घटका पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश आल्यानेच महायुतीला अभूतपूर्व यश लाभल्याबद्दल ना.रामदास आठवले यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि राज्यभरातील जनतेचे आभार मानले आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने संविधान बदलणार असा खोटा प्रचार केला त्यामूळे जनतेच्या डोळ्यात खोट्या प्रचाराची धूळफेक करणाऱ्या महाविकास आघाडीला जनतेने पराभवाची धूळ चारली आहे .लाडकी बहिण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीला महिलांनी चांगलाच धडा शिकवून महायुतीला ऐतिहासिक विजयाची भाऊबीज भेट दिली आहे असे सांगत ना.रामदास आठवले यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत.

बांद्रा येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महायुतीचा महाविजय ढोल वाजवून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.यावेळी ना.रामदास आठवले यांनीही ढोल वाजवून महायुती चा विजय साजरा केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन ना.रामदास आठवले यांनी महायुती च्या तिन्ही नेत्यांचे अभिनंदन केले.

10वर्षामध्ये 10 लाख कोटी पेक्षा जास्त पैसे महाराष्ट्राच्या विकासास केंद्राकडून मिळाले आहेत.नरेंद्र मोदींनी गरिब,युवा,महिला, दलित,आदिवासी आणि ओबीसी या सर्वासाठी काम केलेले आहे.या महाराष्ट्रातील जनतेले भरभरुन आम्हाला पाठिंबा दिलेला आहे.एकतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चुकीच्या पध्दतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणुन टोमणे मारण्यात आले होते.संजय राऊत सारखे नेत्यांनी सातत्याने चुकीच्या पध्दतीने बोलत होते.त्यामुळे लोकांनी ठरविले की महाविकास आघाडीला धडा शिकवणे अत्यंत आवश्यक आहे. महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी केलेल आहे.

आम्हाला अपेक्षा होती 170 जांगा मिळतील पण त्यापेक्षा जास्त 60 जागा जास्त मिळाल्या आहेत. महायुतीच सरकार एक-दोन दिवसा मध्ये स्थापन होईल.संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना दुसरा काही धंदा नाही.राजकारणामध्ये उलट-सुलट बोलून मत पडणार नाही हे लोकांनी त्यांना दाखवून दिल आहे. संजय राऊत म्हणतात त्यांना हा निर्णय मान्य नाही की तुमच्या एवढ्या जागा निवडुन आल्या.लोकसभेमध्ये तुमच्या 21 जागा निवडूण आल्या तर आमच्या 17 जागा. मशीन मध्ये काहीतरी गडबडी केली आहे. लोकशाही मध्ये पराभव स्विकारण हीच खरी लोकशाही आहे.संजय राऊत यांना लोकशाही मान्य नसेल,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मान्य नसेल तर संजय राऊत यांना या देशात राहण्याचा अधिकारच नाही.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading