भरधाव कारमुळे अपघात होऊन एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

भरधाव कारमुळे अपघात होऊन एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि.१३/११/२०२४ – दिनांक 12/11/2024 रोजी दुपारी 03/30 वा.चे सुमारास माझा मुलगा समाधान हनमंत एरंडे वय 21 वर्षे व माझे वडील सुंदाप्पा आप्पा एरंडे वय 56 वर्षे दोघे रा.जालीहाळ ता.मंगळवेढा जि. सोलापूर हे मंगळवेढा शिवारातील मोहन फुगारे यांचे शेतातील ज्वारी कोळपण्याचे कामांसाठी गेले होते.तेथील काम संपल्यानंतर आमचे हिरो स्प्लेंन्डर मोटार सायकल क्र.MH13-DX-1877 वरून गावी मौजे जालीहाळ येथे जाण्यासाठी सुग्रण हॉटेलजवळील मंगळवेढा ते सोलापूर जाणारे रस्त्यावरील रस्ता ओलांडण्याचे ठिकाणावरुन मोकळ्या जागेतुन रस्ता ओलांडत होते.

ते रस्ता ओलांडत असताना मंगळवेढाकडून सोलापूरकडे जाणारी ट्रीबर चारचाकी कार क्र.MH13-DT-0110 या वरील चालकाने कार भरधाव वेगात हयगयीने व निष्काळजीपणे, रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून माझा मुलगा समाधान व माझे वडील सुंदाप्पा यांचे मोटार सायकलीस जोराची धडक देऊन वडील सुंदाप्पा आप्पा एरंडे यांना गंभीर जखमी करून त्यांचे मरणास व मुलगा समाधान हनमंत एरंडे यास गंभीर जखमी करणेस तसेच मोटार सायकलचे नुकसान करणेस कारणीभूत होऊन त्यांना उपचाराकरीता घेऊन न जाता तेथून निघून गेला आहे म्हणून माझी ट्रीबर चारचाकी कार क्र. MH13 DT 0110 वरील अज्ञात चालक याचे विरूध्द फिर्याद दिली आहे .

याबाबत मंगळवेढा पोलीस ठाणे गुरनं /2024 भा न्या सं कलम 281, 106, 125 (अ), 125 (ब), 324(2) मो वा का कलम 184 134 (अ) (ब) प्रमाणे गुन्हा हनमंत सुंदाप्पा एरंडे वय 40 वर्षे धंदा शेती/मजुरी, रा. जालीहाळ ता.मंगळवेढा जि. सोलापूर यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला असून याचा तपास मंगळवेढा पोलीस ठाणेचे पो.ना./926 जाधव हे करत आहेत.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading