शैक्षणिक कारणासाठी लागणारे दाखले काढून घेण्याचे आवाहन
अतिरिक्त पैसे आकारल्यास क्यु आर कोड स्कॅनवर करा तक्रार

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.9 – इयत्ता 10 वी व 12 वीच्या निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेकरीता विद्यार्थी व पालकांची विविध दाखले काढण्यासाठी सर्व आपले सरकार सेवा केंद्र व सेतू कार्यालयात गर्दी होते आणि ब-याच विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे शैक्षणिक कारणासाठी लागणारे विविध दाखले त्वरीत काढून घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.

विद्यार्थी व पालकांनी पुढील प्रवेशाकरीता गरजेचे शैक्षणिक दाखले मिळण्यासाठी जवळच्या सेतु केंद्रात,आपले सरकार केंद्र येथे अर्ज करावेत तसेच ठराविक दरापेक्षा अतिरिक्त दर आकारल्यास आपले सरकार सेवा केंद्र व सेतू कार्यालयात दर्शनी भागात क्यू आर (QR)कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.संबंधितांना क्यु आर कोड स्कॅन करून यावर तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यावरील तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्यासंबंधी कारवाई करण्यात येईल असेही प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले आहे.
तहसिल कार्यालय पंढरपूर यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान ग्रामस्तरावर राबविण्यात येणार आहे.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
