आता… पंढरपूरात ही मिळणार मोफत लाडू प्रसाद या मथळ्याखाली प्रसिध्द झालेल्या बातमीबाबत
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.16 :- आता पंढरपूरातही मिळणार मोफत लाडू प्रसाद तसेच पंढरपूरात भाविकांना मोफत प्रसाद या मथळ्याखालील प्रसिध्द झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने खुलासा करण्यात येतो की,श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शन रांगेतील भाविकांमधून प्रसादाची मागणी होत आहे. दैनंदिन मंदिर समितीमार्फत देवाला जो काही नैवेद्य दाखवतो (महानैवेद्य वगळून) तो भाविकांमध्ये दैनंदिन वाटप करण्यात येतो.याशिवाय श्रींच्या चरणावर येणारे पेढे, बर्फी, साखर इत्यादी प्रसाद देखील भाविकांना वाटप करण्यात येत आहे. त्यासाठीसुद्धा आवश्यक असणारी परवानगी घेतल्यानंतर मंदिर समितीने निर्णय घेतला तर प्रसाद दिला जाईल असे माझे स्टेटमेंट असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून अन्नछत्रात मोफत पोटभर भोजन प्रसाद तसेच अल्प देणगी मुल्य आकारून बुंदी व राजगिरा लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो.याशिवाय मंदिर समिती मार्फत पुरेसा प्रमाणात भाविकांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे यावेळी मनोज श्रोत्री यांनी सांगितले.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
