Bank Holidays : एप्रिल मध्ये बँका 16 दिवस बंद राहतील सुट्ट्यांची यादी जाणून घ्या

[ad_1]

Bank Holidays
दरवर्षी प्रमाणे या वेळी एप्रिल महिन्याची सुरुवात केवळ नवीन आर्थिक वर्षच नाही तर विविध सण घेऊन येत आहे. देशांच्या विविध भागात महत्त्वाच्या सणांमुळे बँकेला सुट्टी असणार आहे. बँकेशी संबंधित काम करायचे असल्यास बँकांना सुट्टी कधी आहे हे जाणून घ्या. आरबीआय ने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. चला तर एप्रिल महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची यादी बघा.

ALSO READ: बँक सर्व्हर डाउन, UPI पेमेंटमध्ये विलंब होत असल्याने ग्राहक त्रस्त

1 एप्रिल रोजी बँका बंद राहतील

1 एप्रिल 2025 रोजी देशभरातील सर्व बँकांमध्ये आर्थिक वर्षासाठी वार्षिक बँक खाते बंद होईल. याशिवाय, झारखंडमध्ये पारंपारिक सण सरहुल देखील साजरा केला जाईल, ज्यामुळे तेथील बँका देखील बंद राहतील. दरवर्षी हा दिवस बॅक-एंड प्रक्रियांसाठी राखीव असतो.

 

बाबू जगजीवन राम जयंती: 5 एप्रिल रोजी तेलंगणामध्ये सुट्टी

बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त तेलंगणा राज्यात 5 एप्रिल रोजी बँका बंद राहतील. 

 

महावीर जयंती: 10 एप्रिल रोजी अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी

10 एप्रिल रोजी महावीर जयंतीनिमित्त गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा यासारख्या राज्यांमध्ये बँकिंग सेवा बंद राहतील. 

ALSO READ: 1 एप्रिलपासून बँकिंगचे ‘हे’ नियम बदलणार

आंबेडकर जयंती आणि नववर्ष उत्सव: 14 एप्रिल रोजी देशभरातील बँका बंद राहतील

14 एप्रिल हा भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती आहे. या दिवशी नवी दिल्ली, मध्य प्रदेश, चंदीगड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, छत्तीसगड, मेघालय आणि हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये बँका बंद राहतील. तसेच, विशु (केरळ), तमिळ नववर्ष, बिहू (आसाम), पोयला वैशाख (बंगाल) सारखे नवीन वर्षाचे सण देखील या दिवशी साजरे केले जातात.

 

बंगाली आणि बिहू नववर्ष: 15 एप्रिल रोजी ईशान्येकडील राज्यांमध्ये सुट्टी

15 एप्रिल रोजी आसाम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रादेशिक नववर्षानिमित्त बँकांना सुट्टी असेल. 

ALSO READ: UPI युजर्ससाठी 1 एप्रिलपासून नियम बदलणार

गुड फ्रायडे: 18 एप्रिल रोजी अनेक राज्यांमध्ये बँका बंद होत्या.

18 एप्रिल रोजी गुड फ्रायडेनिमित्त त्रिपुरा, आसाम, राजस्थान, जम्मू, हिमाचल प्रदेश आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

 

गरिया पूजा: 21 एप्रिल रोजी त्रिपुरामध्ये बँकांना सुट्टी

21 एप्रिल रोजी त्रिपुरामध्ये गरिया पूजा हा आदिवासी सण साजरा केला जातो. या दिवशी येथील बँका बंद राहतील.

 

परशुराम जयंती: 29 एप्रिल रोजी हिमाचलमध्ये बँका बंद

29 एप्रिल रोजी भगवान परशुराम जयंतीनिमित्त हिमाचल प्रदेशात बँकांना सुट्टी असेल. 

 

बसव जयंती आणि अक्षय तृतीया: 30 एप्रिल रोजी कर्नाटकात सुट्टी

कर्नाटकमध्ये 30 एप्रिल रोजी बसव जयंती आणि अक्षय्य तृतीया साजरी केली जाईल, त्यामुळे तेथे बँका बंद राहतील

Edited By – Priya Dixit

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading