पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे फळबागांचे व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०५/२०२४ – पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे फळबागांचे व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कल्याण काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन नुकसान झालेल्या फळबागा व पिकांचे त्वरित पंचनामे होऊन शेतकर्यांना भरीव मदत मिळावी तसेच विमा कंपन्यांची पिक विम्याची मुदत 31 मार्च ला संपते त्या मध्ये बदल करुन 31 मे पर्यंत विमा कंपन्यांची मुदत वाढवून देण्यात यावी. कारण मागील पाच वर्षांपासून एप्रिल आणि मे या दोन महिन्यात अवकाळी पाऊस व वादळी वार्याचे प्रमाण वाढले आहे आणि याही वर्षी एप्रिल आणि मे या दोन महिन्यात अवकाळी पाऊस व वादळी वारे झाल्याने शेतकऱ्यांचे फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे (केळी,द्राक्षे,दाळिंब व ईतर पिके) त्यामुळे ही मुदत वाढवून दिल्याने शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळेल यासाठी कल्याण काळे यांनी निवेदन दिले.
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवेदनाची दखल घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
