धर्मादाय दवाखाने तसेच खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची आर्थिक लूट केली जात आहे – आमदार समाधान आवताडे
शासन निर्णयाप्रमाणे १० टक्के बेड राखीव असून देखील बेड उपलब्ध होत नाहीत
मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान धर्मादाय दवाखाने तसेच खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची आर्थिक लूट केली जात असून शासन निर्णयाप्रमाणे १० टक्के बेड राखीव असून देखील बेड उपलब्ध होत नाहीत.त्यामुळे संबंधित मुद्द्यांवर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.

यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी धर्मादाय अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या हॉस्पिटलमधून जनतेची होणारी लूट व रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवेमध्ये दुजाभाव केला जातो तसेच रुग्णांवर आवश्यक उपचार केला जात नाही. त्यामुळे संबंधित धर्मादाय दवाखान्यांचा आढावा घेऊन विश्वस्त मंडळावर कारवाई करण्याची मागणी केली.
तसेच धर्मादाय रुग्णालयांमध्ये व खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते व त्यांना सेवा दिली जात नाही.अव्वाच्या सव्वा बिल आकारून रुग्णांची आर्थिक लूट केली जाते.त्यामुळे राज्य शासनाने खाजगी रुग्णालयांवर निर्बंध घालावेत अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली.
आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या मागण्या रास्त आहेत मात्र बायो मेडिकल वेस्ट गोळा करण्याच्या नावावर ती हॉस्पिटलला प्रत्येक बेड मागे मोठी रक्कम आकारण्यात येत असून आतातर सोलापूर जिल्ह्यात चौपट आकारणी करण्यात आली आहे.याचा भुर्दंड रुग्णांनाच सोसावा लागणार आहे त्याबाबतही शासनाने लक्ष घालून रुग्णांचा भार कमी करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
