हाजापूर येथे विहीर खोदताना परराज्यातील मजूराच्या डोक्यात दगड पडून झाला मृत्यू
अकस्मात मयत अशी मंगळवेढा पोलीसात झाली नोंद…..
मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि.८ फेब्रुवारी- हाजापूर येथे विहिरीचे काम करत असताना परराज्यातील मजूराच्या डोक्यात विहिरीच्या कडेचा दगड पडून गंभीर जखमी होवून मयत झाल्याची घटना घडली असून याची अकस्मात मयत म्हणून नोंद मंगळवेढा पोलीसात करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाजापूर येथे दर्याप्पा आण्णा पाटील यांच्या विहिरीचे काम करीत असताना मजूर प्रद्युम्न विश्वकर्मा हे दि.७ फेब्रुवारी रोजी दुपारी २.१५ वाजता विहिरीचे काम करीत असताना विहिरीच्या कडेचा दगड डोक्यात पडून गंभीर जखमी झाले.त्यास ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे उपचारासाठी नेले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून ते मयत झाले असल्याचे सांगितले. याची खबर समाधान भारत गडदे रा.पाठखळ यांनी पोलीसात दिली आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
