पंढरपूर मंगळवेढाच्या विकासासाठी मतदान रुपी आशीर्वाद द्या : दिलीप धोत्रे

पंढरपूर मंगळवेढाच्या विकासासाठी मतदान रुपी आशीर्वाद द्या : दिलीप धोत्रे

दिलीप धोत्रे यांनी केलेली कामे सोशल मीडियावर व्हायरल

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारार्थ सभांना मंगळवेढा तालुक्यातील विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.यामुळे यंदा परिवर्तन अटळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सोमवारी मनसेची जाहीर सभा मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी, तळसंगी,भालेवाडी, डोणज,शेलेवाडी,अकोला, आंधळगाव,दहिवडी या गावांमध्ये प्रचार सभा संपन्न झाली.

यावेळी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाली की मतदार संघातील नागरिकांना काम करणारा व्यक्ती पाहिजे.विद्यमान लोकप्रतिनिधींनी मतदार संघातील कामे कागदावर मंजूर करून आणली.मात्र प्रत्यक्षात कोठेही विकास दिसत नाही.देश स्वातंत्र्य होऊन ७६ वर्ष झाले तरी मंगळवेढ्यातील जनतेला पाणी आणि मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे.

अनेक युवक बेरोजगार झाले आहेत. असा सवाल उपस्थित करत त्यांनी मतदार संघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे.युवकांना रोजगार निर्मिती करून त्यांना नोकरी उपलब्ध करून दिली पाहिजे. महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग जाग्यावर उपलब्ध करून दिले पाहिजेत. यासाठी आपला मतदान रुपी आशीर्वाद द्यावा असे आवाहन दिलीप धोत्रे यांनी केले आहे.

मनसेकडून राज्यातील पहिली उमेदवारी दिलीप धोत्रे यांना जाहीर झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष्याची भूमिका पोहोचण्यात ते यशस्वी झाले आहेत.राजकारणा बरोबरच त्यांनी समाजकारणामध्ये मोठे योगदान दिले आहे. यामुळे दिवसेंदिवस त्यांना विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे.

मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांचा सोशल सोशल मीडिया वरही जोरदार प्रचार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी सुरुवातीपासूनच मतदार संघात प्रचारात आघाडी घेतली होती.गाव भेट दौरे, जाहीर सभा, होम टू होम प्रचारावर त्यांनी भर दिला होता.आता त्यांचा सोशल मीडियावर ही जोरदार प्रचार सुरू आहे.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading