ग्रामस्थांचा एकच निर्धार,पुन्हा येणार महायुतीचा शिलेदार
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.२०/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यातील मिरी गावाला महायुतीचे भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत अशा घोषणा देत सत्कार केला आणि लोकसभा विजयासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधत सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहून काम करण्याचे आश्वासन आमदार राम सातपुते यांनी दिले.

यावेळी ज्येष्ठ नेते व मा.आमदार राजन पाटील यांनी मार्गदर्शन करत मोदी सरकारच्या नेतृत्वामध्ये अनेक यशस्वी योजनांची माहिती देत केलेल्या कामांबद्दल चर्चा केली. जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार राम सातपुते यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचे आवाहन माजी आमदार राजन पाटील यांनी मतदारांना केले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते व मा.आमदार राजन पाटील,मोहोळचे आमदार यशवंत माने , राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, रमेश माने, सतिश भोसले, अस्लम चौधरी, सोमनाथ धावणे, पाराप्पा पुजारी, भिमराव पुजारी, रंगसिद्ध पुजारी, बाळकृष्ण पाटील, निखिल पाटील,दादा भोई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
