[ad_1]

देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी पत्नीची हत्या करून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला संशयास्पद अवस्थेत बघितल्यावर त्याला पकडले आणि चौकशी केली.
चौकशीत धक्कादायक खुलासा झाला. त्याने सांगितले की त्याने पत्नीची कार मध्ये हत्या केली.
सदर घटना दिल्लीतील ख्याला परिसरातील आहे.मध्यरात्री 1:20 च्या सुमारास पोलिसांना एक व्यक्ती रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात ही माहिती दिली. पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले त्याची चौकशी केल्यावर त्याने त्याचे नाव गौतम असल्याचे सांगितले नंतर त्याने पत्नीची कार मध्ये हत्या केल्याचे मान्य केले.
आरोपीचे मार्च मध्ये लग्न झाले तरीही ते दोघे वेगळे राहत असल्याचे तो म्हणाला. त्यांच्या लग्नांला कुटुंबीयांचा विरोध असल्याने ते वेगवेगळे राहायचे आणि अधून मधून भेटायचे. रविवारी त्यांची भेट झाली आणि पत्नीने सोबत राहण्याचा हट्ट धरला. या वरून दोघांमध्ये भांडण झाले आणि रागात येऊन त्याने पत्नीची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या केली आणि कार शिवाजी पार्क जवळ पार्क केली नंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस हवालदाराने त्याला पकडले. त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्याची अजून चौकशी सुरु आहे.
Edited by – Priya Dixit
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
