फोटो पोस्ट करताय सावध व्हा तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात – ॲड.चैतन्य भंडारी

फोटो पोस्ट करताय सावध व्हा तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात – ॲड.चैतन्य भंडारी

धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज – आजच्या डिजिटल युगात,सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं सर्वसामान्य झालं आहे. पण यामध्ये एक गंभीर धोका निर्माण झाला आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करतोय.तुमचे फिंगरप्रिंट्स जे तुमच्या हाताच्या बोटांवर असतात हे फोटोद्वारे चोरले जाऊ शकतात आणि फसवणूक केली जाऊ शकते.

नुकत्याच समोर आलेल्या प्रकरणांमध्ये गुन्हेगारांनी सोशल मीडियावरील फोटोंमधून व्यक्तींचे फिंगरप्रिंट्स क्लोन करून आधार सक्षम पेमेंट सिस्टमच्या माध्यमातून बँक खात्यांमधून पैसे काढले आहेत. फिंगर प्रिंट्ससारखी संवेदनशील माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यापासून टाळा, तुमच्या सोशल मीडिया खात्यांची सुरक्षा सेटिंग्ज वाढवा आणि दोन-अंकी प्रमाणीकरण वापरून खात्यांची सुरक्षा सुनिश्चित करा,असा सल्ला सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी यांनी दिला आहे.

सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी

सोशल मीडियावर फिंगरप्रिंट्स किंवा इतर बायोमेट्रिक डेटा उघड करणारे फोटो किंवा माहिती पोस्ट करण्यापासून टाळा. खाते सुरक्षित करा, सोशल मीडिया आणि बँकिंग अ‍ॅप्सवरील खात्यांच्या सुरक्षितता सेटिंग्ज वाढवा आणि टु स्टेप व्हेरीफिकेशनचा वापर करा.विश्वासार्ह असलेल्या प्लॅटफॉर्मचाच वापर करा,बायोमेट्रिक डेटा शेअर करण्यासाठी अधिकृत आणि विश्वसनीय प्लॅटफॉर्मचाच वापर करा. सॉफ्टवेअर अपडेट्स करा तुमच्या डिव्हाइसेसवर नवीनतम सुरक्षा अपडेट्स इन्स्टॉल करा. बायोमेट्रिक लॉग्स तपासा. तुमच्या बायोमेट्रिक डेटाचा वापर बँकिंग किंवा इतर सेवांसाठी होतो का हे नियमितपणे तपासा. फोटो पोस्ट करण्याआधी सावधानता बाळगा आणि तुमच्या सुरक्षिततेची काळजी घ्या अन्यथा तुमच्या निष्काळजीपणामुळे गंभीर आर्थिक नुकसान होऊ शकतं त्यामुळे सावध राहा. जर आपल्यासोबत अशा प्रकारचे काही गुन्हे घडले असतील तर आपण तात्काळ १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन सायबर तज्ञ ॲड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading