पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी पतसंस्था नं.१ च्या चेअरमनपदी दिनेश साठे व्हॉइस चेअरमनपदी दत्तात्रय चंदनशिवे सेक्रेटरीपदी तानाजी अधटराव

पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी पतसंस्था नं.१ च्या चेअरमनपदी दिनेश साठे व्हॉइस चेअरमनपदी दत्तात्रय चंदनशिवे सेक्रेटरीपदी तानाजी अधटराव बिनविरोध

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नं.१ निवडणूक बिनविरोध पार पडली होती. निवडून आलेल्या नूतन संचालक मंडळाची निवडणूक निर्णय अधिकारी पी.बी.सावंत यांनी चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी सभा आयोजित केली होती.

या झालेल्या सभेमध्ये पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी पतसंस्था नं.१ च्या चेअरमन पदासाठी दिनेश साठे ,व्हॉइस चेअरमन पदासाठी दत्तात्रय चंदनशिवे, सेक्रेटरी पदासाठी तानाजी अधटराव यांचा एक एकच अर्ज आल्याने या सर्वांची बिनविरोध निवड झाल्याची जाहीर करण्यात आले.

यावेळी कामगार नेते संस्थचे माजी जेष्ठ संचालक अँड.सुनिल वाळुजकर,पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे,कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, सहकार्याध्यक्ष माजी संचालक शरद वाघमारे,प्रीतम येळे, अनिल पांडुरंग अभंगराव,आरोग्य अधिकारी नागनाथ तोडकर हे उपस्थित होते.

यावेळी माजी चेअरमन व नूतन संचालक जयंत पवार, धनजी वाघमारे, चंद्रशेखर वेळापुरे,चिदानंद सर्वगोड,संभाजी देवकर, नवनाथ पवार, सौं.राणी गायकवाड, श्रीमती लक्ष्मी हुंडेकरी यांचाही सत्कार निवडणूक निर्णय अधिकारी पी बी सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

आभार शरद वाघमारे यांनी मानले. सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पतसंस्थेचे लिपिक संजय माने यांनी प्रयत्न केले.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading