गावोगावी आराखड्यात नसलेल्या रस्त्यांची ग्रामपंचायतकडे नोंद करा – आ.समाधान आवताडे
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०८/ २०२४- पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये वाड्या- वस्त्यावर जाणारे अनेक रस्ते हे निधीपासून वंचित राहत असून केवळ त्याची शासन दप्तरी नोंद नसल्यामुळे त्यावर निधी टाकणे मुश्किल होत आहे तरी 15 ऑगस्ट च्या ग्रामसभेमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने नॉन प्लान रस्ते प्लानमध्ये घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून संमती घेऊन ग्रामपंचायत दप्तरी नोंदणी करावी व तसा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे सादर करावा म्हणजे त्या रस्त्यांना निधी देणे सोयीस्कर होईल असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी ग्रामस्थांना केले आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की सध्या अनेक वाड्या-वस्त्यांवर जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वाड्यावरस्त्यावरील नागरिक निधीची मागणी करण्यासाठी माझ्याकडे येत असतात मात्र त्या रस्त्याची नोंद ग्रामपंचायत दप्तरी आहे का विचारल्यास ते नोंद नसल्याचे सांगतात.त्यामुळे त्या रस्त्याला माझी निधी देण्याची इच्छा असून ही निधी देता येत नाही, तरी जे रस्ते आराखड्यात घ्यावयाचे आहेत तेथील नागरिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांकडून स्टॅम्प वरती संमती देऊन त्या रस्त्याची नोंद ग्रामपंचायतकडे करावी म्हणजे त्या रस्त्यासाठी भरघोस निधीची तरतूद करणे सोयीस्कर होईल.
15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये मतदारसंघा तील सर्व गावातील ग्रामस्थांनी आपापल्या गावातील वाड्या-वास्तववर असणाऱ्या रस्त्यांची नोंद ग्रामपंचायतकडे करावी तरच येत्या काळात त्या रस्त्यावर दुरुस्तीसाठी निधी देणे सोयीस्कर होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीनेही गावातील नॉन प्लान रस्ते प्लानमध्ये घेऊन वरिष्ठ कार्यालयास अहवाल लवकरात लवकर सादर करावा. प्लॅन मधील रस्त्याला मी मागेल तिथे निधी दिला असून सध्या नॉन प्लान रस्त्याच्या निधी मागणीची संख्या जास्त असून त्या रस्त्यांना ही निधी मिळवण्यासाठी ग्रामपंचायतने कागदपत्राची पूर्तता करून वाड्यावस्त्यावरच्या रस्त्यांच्या सुधारणासाठी माझ्या कार्यालयाकडे निधीची मागणी करावी असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना केले.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
