शिवसेनेची पुनर्बाधणी करीत विधानसभेसाठी ताकतीने मैदानात उतरणार – जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे

पंढरपूर शहर तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाकडून भगवा सप्ताह अभियानास सुरुवात

शिवसेनेची पुनर्बाधणी करीत विधानसभेसाठी ताकतीने मैदानात उतरणार – जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राज्यभरात हिंदुहृदय सम्राट,शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा महाराष्ट्र घडवण्यासाठी व शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भगवा सप्ताह अभियान राबिवण्यात येत आहे.महाराष्ट्र पुन्हा प्रगतिशील वैभवशाली बनवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महिला आघाडी, सर्व युवा सेना शिवसेना आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत पुनर्बाधणी करण्यासाठी हा भगवा सप्ताह राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवार दि.८ ऑगस्ट रोजी पंढरपुरात शिवसेना उद्धव ठाकरे सेनेकडून भगवा सप्ताह अभियानास सुरुवात झाली. मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर, विभागीय नेते ( सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर ) सुनिल प्रभू, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकिळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून हे अभियान राबिण्यात येत आहे.

पंढरपुरात आयोजित भगवा सप्ताह शुभारंभ प्रसंगी बोलताना शिवसेनेचे पंढरपुर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रति निष्ठा असलेल्या शिवसैनिकांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जीवाचे रान करून माढा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याचे दिसून आले होते.आता आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या अभद्र युतीला आणि मिंधे सरकारला हाकलून लावण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी व कट्टर शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहन केले.यावेळी माढा विभाग सहसंपर्क प्रमुख साईनाथ अभंगराव, युवा सेना सहसचिव स्वप्नील वाघमारे,शहर प्रमुख रवी मुळे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख ऍड.पूनम अभंगराव यांनीही शिवसैनिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या भगवा सप्ताहानिमित्त सभासद नोंदणी, गाव तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक अभियान राबविणे,मतदार यादीचे वाचन आदी उपक्रमाचा समावेश यात असून शहरात व तालुक्यात गावोगावी भगवा सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे.

माढा लोकसभा सहसंपर्क प्रमुख साईनाथ अभंगराव,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोलापूर जिल्हा प्रमुख ( पंढरपूर विभाग ) संभाजी शिंदे, उपजिल्हा प्रमुख ( ग्रामीण ) जयवंत माने, उपजिल्हा प्रमुख ( शहर ) सुधिर अभंगराव, युवासेना प्रदेश सहसचिव स्वप्निल वाघमारे, महिला आघाडी जिल्हा संघटिका पुनम अभंगराव, युवा सेना नेते रणजीत बागल, युवासेना जिल्हा युवाधिकारी गणेश इंगळे,आरोग्य सेना जिल्हा संघटिका सौ.राजश्रीताई क्षीरसागर, पंढरपूर तालुका प्रमुख बंडू घोडके,शहर प्रमुख रविंद्र मुळे, इंद्रजित गोरे,कल्याण कवडे,शिवाजी जाधव, महंमद पठाण, काकासाहेब बुराडे, रणजित कदम,संजय घोडके, नागेश रितुंड, उत्तम कराळे, प्रवीण शिंदे,लंकेश बुराडे,विनय वनारे,सचिन बंदपट्टे,तानाजी मोरे,अविनाश वाळके, संगीता पवार,पूर्वा पांढरे,अनिता आसबे, संजीवनी चुंबळकर,शरीफा पठाण, मंजुळा दोडमिसे,अनिता पटाईत,शीतल आदापुरे, संजय पवार,महेश इंगोले,विजय बागल, लोकमान्य इनामदार,अंकुश माने, बापू कोळे, बाळासाहेब देवकर यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पंढरपूर शहर व तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी, सर्व महीला आघाडी व युवासेना,वैद्यकीय सेना,वाहतूक सेना,रिक्षा सेना व सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading