तर पंढरपूर विधानसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार घालणार
अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेने दिला प्रशासनास इशारा
जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनानंतर संघटनेचे पंढरपुरातील आंदोलन मागे
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०८/२०२४ – अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या वतीने पंढरपूर नगरपरिषद येथील प्रलंबित वारसा हक्काने अर्ज केलेल्या अर्जदारांना शासन निर्णय नुसार लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नोकरीत समाविष्ट करण्याबाबतचे लेखी निवेदन संघटनेच्या वतीने देण्यात आले ही मागणी मान्य न झाल्यास अन्यथा 9 ऑगस्ट क्रांतीदिना दिवशी बेमुदत सत्याग्रह आंदोलन संघटनेने पुकारले होते सदर आंदोलनाच्या निवेदना संदर्भात पंढरपूर नगरपालिकेने सदर आंदोलन मागे घेण्याबाबत लेखी पत्र दिलेले आहे पण सदर पत्रामध्ये नगरपालिकेने चुकीची व दिशाहिन माहिती संघटनेला देऊन शासन निर्णयाची पायमल्ली केलेली आहे याबद्दल पंढरपूर नगरपालिकेचा संघटनेच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला व त्या प्रतिची होळी करण्यात आली. मात्र सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
19 ऑगस्टपर्यंत संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन आज शुक्रवार दि.9 ऑगस्ट रोजी पंढरपूर नगर पालिकेला देऊन सदर आंदोलन तूर्तास स्थगित केलेले आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष गुरू दोडिया यांनी दिली.
शासनाच्या निर्णयाची पंढरपूर नगरपालिकेने पायमल्ली केलेली आहे तसेच पंढरपूर नगरपालिका सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्कापासून वंचित ठेवण्याचा घाट घालत आहे.पंढरपूर नगरपालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही निर्देश धाब्यावर ठेवत आहे म्हणून पंढरपूर नगरपालिका प्रशासनावर शिस्तभंगाची व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत.
9 ऑगस्ट क्रांती दिना दिवशी सत्याग्रह आंदोलन होणार होते सदर आंदोलनाचे निवेदन सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दि. 07/08/2024 रोजी संघटनेच्या वतीने देण्यात आले होते त्यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सध्या पंढरपूर नगरपालिकेचे मुख्यधिकारी जाधव हे रजेवर आहेत म्हणून सदर आंदोलन आपण स्थगित करावे मुख्यधिकारी आल्यानंतर या संदर्भात आपण बैठक लावू असे तोंडी आश्वासन दिल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन अधिकारी विनाताई पवार मॅडम यांच्या आश्वासनास मान देऊन व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक, प्रदेशाध्यक्ष दिलीप चांगरे, प्रदेश सचिव बालीजी मण्डेपू,संघटक सायमन गट्टू, श्रीनिवास रामगल,दशरथ आडगूळ यांच्या सुचनेनूसार सदर आंदोलन तूर्तास स्थगित केलेले आहे.
पंढरपूर नगरपालिकेने सदर आंदोलनाबाबत संघटनेला दिलेल्या पत्राचा निषेध करण्यासाठी वारसदार मोठ्या संख्येने नगरपालिकेत उपस्थित झाले होते. 9 ऑगस्ट 2024 रोजी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेले बेमुदत सत्याग्रह आंदोलन जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनानंतर तूर्तास 19/08/2024 पर्यंत स्थगित करीत आहोत जिल्हाधिकारी यांनी आश्वासनानुसार बैठक लावून न्याय द्यावा अन्यथा 19 ऑगस्ट नंतर बेमुदत बैठा सत्याग्रह आंदोलन पंढरपूर नगरपालिकेचे कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत होणार व येणाऱ्या विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकणार याप्रमाणे निवेदन आज रोजी पंढरपूर नगर पालिकेला देऊन सदर आंदोलन तूर्तास स्थगित केलेले आहे.
यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष गुरु दोडिया, उपाध्यक्ष काशिनाथ सोलंकी, सचिव महेश गोयल,संघटक कल्पेश गोयल,सचिन मेहडा, अमित वाघेला, प्रमोद वाघेला, हेमंत मेहडा, राजन गोयल, योगेश मेहडा, रमेश सोलंकी, लुकेश परमार, प्रवीण सोलंकी, राजू वाघेला, जया वाघेला, सीता गोयल, मीना वाघेला, नीता वाघेला, भावना गोयल, सोनू गोयल, शीला मेहडा, किरण सोलंकी यांच्यासह मोठ्या संख्येने अर्जदार उपस्थित होते.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
