खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत अर्थसंकल्पावर बोलताना सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी केल्या अनेक मागण्या
नवीन संसद भवनात इतिहासाची दिली जाणीव करून
नवी दिल्ली,दि.२३ जुलै २०२४- संसदेत काँग्रेस पक्षाच्यावतीने अर्थसंकल्पावर खा. प्रणिती शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त केले.
यावेळी बोलताना खा.प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोने की चिडिया असलेला भारत देश अनेक परकियांनी लुटला तरीही काँग्रेसच्या धोरणामुळे चंद्रावर जाण्यापर्यंत मजल मारली त्याचा पाया काँग्रेसने घातला. देशात दहा वर्षे सत्ता असूनही भाजप असे सांगत आहे की हिंदु खतरे मे है. हिंदुना घाबरवून भाजपला आपले राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.देशात जातीपातीचे राजकारण सुरू आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मागासवर्गीयांना स्थान आणि सन्मान मिळत आहे ते भाजपला बघवत नाही म्हणून आरक्षण मिटविण्याचा घाट भाजपने घातला आहे.याकरिता शासकीय निमशासकीय क्षेत्रात भरती करताना खाजगी कंपन्यांद्वारे कर्मचाऱ्यांची भरती करत आहेत त्यामुळे आरक्षण संपत आहे.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी केंद्र सरकारकडे खालील मागण्या केल्या आहेत-
किसान सन्मान योजनेचे अनुदान सहा हजार वरून बारा हजार करावे.
पीक विमा योजना महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली,सातारा यांना इतर जिल्ह्यात बाजरी, मका, सोयाबीन ला पीक विमा मिळतो त्याप्रमाणे हरभरा व उडीद इतर पिकांनाही मिळावी.
पंतप्रधान आवास योजनेचे टार्गेट मिळावे, अटी शिथिल करून प्रलंबित सर्व प्रकरणे मंजूर करावीत,अनुदान एक लाख चाळीस हजार वरून दोन लाख पन्नास हजार करावे.
कोरोना काळात मुद्रा योजनेतील जे कर्जदार कर्ज फेडू शकले नाहीत ते कर्ज माफ करावे. तसेच सामान्य माणसाला मुद्रा कर्ज मिळावे.
सोलापुरात विडी कामगार,असंघटित कामगारांकडून मायक्रोफायनान्स, चिटफंड वाले जास्त व्याज घेतात त्यांच्यावर बंधने घालण्यात यावीत.
अन्न सुरक्षा योजनेपासून देशातील जवळपास दहा कोटी लोक वंचित आहेत त्यांना योजनेत समावेश करून ताबडतोब धान्य मिळावे.
सरकार टिकविण्यासाठी अर्थसंकल्पात जास्त निधी बिहार,आंध्र प्रदेशला देण्यात येऊन सर्वात जास्त कर देणाऱ्या महाराष्ट्रावर निधीच्या बाबतीत अन्याय करण्यात आला. केंद्र सरकार फक्त महाराष्ट्राचा वापर करत आहे.
रेल्वे स्लीपर कोच कमी करत आहे आणि प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीचे डबे वाढवत आहे. पण गरीब लोक स्लीपरने प्रवास करतात त्यामुळे स्लीपर कोच वाढवण्यात याव्यात.
विमानसेवा सुरू करण्यासाठी चिमणी पाडण्यात आली, सोलापुरात विमानतळ आहे पण विमानसेवा सुरू झाली नाही, उडान योजनेत समावेश करून विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी.
बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ कामासाठी निधी मंजूर करावी.
मंगळवेढ्यातील पस्तीस गावच्या सिंचन योजना मंजूर करून निधी द्यावे.
अशा अनेक मागण्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत अर्थसंकल्पावर बोलताना केल्या.
ते पुढे बोलताना म्हणाल्या की, जरी आमच्या जागा कमी आल्या तरी शायरी म्हणत ,
सत्ता के लालच मे न फैलाओ समाज मे ध्रुवीकरण का रोग,
हम हस्ती मिटायेंगे हम भारत के लोग
असे म्हणत एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून जनतेचा आवाज बुलंद करत राहणार असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
