पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील पिक विमा योजना शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात आ.समाधान आवताडे यांनी बोलावली अधिकाऱ्यांसमवेत बैठक
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुक्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023- 2024 ,रब्बी 2023-2024 हंगामातील नुकसान भरपाई वाटप रक्कम, प्रलंबित रक्कम यासंदर्भात तालुका कृषी कार्यालय मंगळवेढा येथे शनिवार दि.10 मे रोजी आमदार समाधान आवताडे, विमा कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक,जिल्हा कृषी अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित केली असून ज्या शेतकरी बांधवांच्या पीक विमा योजनेसंदर्भात अडचणी आहेत त्यांनी लेखी अर्जासह बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन आ. समाधान आवताडे संपर्क कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत 2023-24 खरीप रब्बी हंगामामध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता.परंतु विमा कंपन्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नव्हता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भात आमदार समाधान आवताडे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.या तक्रारीची दखल घेत आमदार समाधान आवताडे यांनी शासनाकडे व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता त्या अनुषंगाने तालुक्यातील मंगळवेढा पंढरपूर मतदार संघातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023-2024,रब्बी 2023- 2024 हंगामातील अस्विकृत पूर्वसूचना, स्विकृत पूर्वसूचना, नुकसान भरपाई वाटप रक्कम, प्रलंबित रक्कम मिळावी यासाठी आ.समाधान आवताडे यांच्यासमवेत पीक विमा कंपनीचे क्षेत्रिय व्यवस्थापक विनायक दिक्षित ,जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या उपस्थितीत बैठक लावण्याचे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालक मंत्री तथा ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, यांनी निर्देश दिलेले आहे.
त्यानुसार शनिवार दि.10 मे रोजी सकाळी 9.00 वा तालुका कृषि अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे वरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले आहे.या बैठकीच्या वेळी मतदारसंघातील शेतकऱ्यांनी पिक विमा संदर्भातील आपल्या तक्रारी लेखी निवेदनाद्वारे घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार समाधान आवताडे संपर्क कार्यालयाचे वतीने करण्यात आले आहे.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
