विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल इशाधिन शेळकंदे यांचा सन्मान

विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल इशाधिन शेळकंदे यांचा सन्मान

शेळकंदे यांची जिद्द,चिकाटी वाखणण्यासारखी – सिईओ कुलदीप जंगम

सोलापूरकरांच्या प्रेमामुळे मी समाधानी – इशाधिन शेळकंदे

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०५/२०२५ –जिल्हा परिषेदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांची मंत्रालयात विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे हस्ते सत्कार करणेत आला.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिईओ कुलदीप जंगम हे होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर,उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव,कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी , कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, शिल्पा शेळकंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरूण तोडकर, मंगळवेढाचे गटविकास अधिकारी श्री कदम, अक्कलकोट चे गटविकास अधिकारी शंकर कवितके, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन डाॅ.माने, लिपीक वर्गीय कर्मचारी ॲड.देशपांडे, मराठा सेवा संघाचे अविनाश गोडसे, संघटनेचे कास्ट्राईब चे कर्मचारी संघटनेचे अरूण क्षिरसागर,विस्तार अधिकारी संघटनेचे ज्ञानेश्वर सुतार, ग्रामसेवक संघटनेचे शरद भुजबळ, अधिक्षक झेड ए शेख, लेखा विभागाचे श्री.हुच्चे प्रमुख उपस्थित होते.

ग्रामपंचायत व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने तुळशीचा हार व स्मृती चिन्ह देऊन सिईओ कुलदीप जंगम यांचे हस्ते गौरव करणेत आला.

शेळकंदे यांची जिद्द,चिकाटी वाखणण्यासारखी – सिईओ कुलदीप जंगम

माझी वसुंधरा अभियान, ग्रामपंचायत कार्यालय उभारणी, ग्रामसेवकांचे प्रश्न,विस्तार अधिकारी पदोन्नोती असे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी उप मुख्य कार्यकारी इशाधिन शेळकंदे यांनी परिश्रम घेतले असे मत सिईओ कुलदीप जंगम यांनी व्यक्त केले. इशाधिन शेळकंदे यांचेकडून खुप शिकण्या सारखे होते. त्यांचेकडे असलेली कामाविषयी निष्ठा सातत्य, जिद्द वाखाणण्यासारखी आहे असेही सिईओ कुलदीप जंगम यांनी सांगितले.

सोलापूरकरांच्या प्रेमामुळे मी समाधानी – इशाधिन शेळकंदे

सोलापूर जिल्ह्यात ७ वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. काम करताना कामाचा शेवटचा दिवस म्हणून काम केले.माझी वसुंधरा अभियाना राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.तत्कालीन सिईओ दिलीप स्वामी यांच्यामुळे प्रेरणा मिळाली.तत्कालीन सिईओ मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲम्बुलन्स व ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व्हॅन घेता आली.सिईओ कुलदीप जंगम यांनी काम करण्याची संधी दिली तर अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांचे समवेत सलग तीन आषाढी यात्रा यशस्वी पार पाडता आल्या.सेवेचा आनंद घेता आला असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी बोलताना सांगितले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक अमोल जाधव,कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी,कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी,शिल्पा शेळकंदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.विविध संघटनांच्यावतीने इशाधिन शेळकंदे यांचा सत्कार करण्यात आला.

dyceoshelkande,ceozpsolapur,zpsolapur,


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading