राष्ट्रीय सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून भारताच्या व महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना माबि हरित चळवळीची पुस्तिका व निवेदन सुपूर्त

मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) हरित चळवळीच्या माध्यमातून रायगडावर शिवपुण्यतिथीला शिवरायांना अनोखे अभिवादन

राष्ट्रीय सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून भारताच्या आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना माबि हरित चळवळीची पुस्तिका आणि निवेदन सुपूर्त

शिवरायांच्या विचाराने प्रेरित असलेली आणि शिवनीतीने कार्यरत असलेल्या माबिचे अनोखे पाऊल…

शिवरायांचा विचारांचा वारसा म्हणजे माबि – परकीय उपद्रवी जैविक आक्रमणाविरोधी हरित चळवळ

पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज- चैत्र पोर्णिमा हनुमान जयंती शके १९४७, शिवपुण्यतिथी दि.१२ एप्रिल २०२५ रोजी दुर्ग दुर्गेश्वर रायगडावर ३४५ वा शिवपुण्यतिथी तसेच शिवसमाधी जीर्णोद्धार शताब्दी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. सदर उपक्रमाचे आयोजन हे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती, महाड यांनी केले होते.सदर उपक्रमाला देशभरातून विशेषत: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त मोठ्या संख्येने शिवसमाधीला-शिवरायांना अभिवादन करण्यासाठी रायगडावर जमले होते.

मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) या संघटनाच्या आणि बायोस्फिअर्स संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना याप्रसंगी अनोखी मानवंदना- शिववंदना देण्यात आली.३४५ व्या शिव पुण्यतिथीचे औचित्य साधून आणि राष्ट्रीय सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून शिवरायांच्या विचाराने प्रेरित असलेली आणि शिवनीतीने कार्यरत असलेल्या माबि चळवळीच्या पुस्तिकेची भेट व निवेदन उपक्रमाला उपस्थित असलेल्या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना व राज्याच्या इतर मंत्री-महोदयांना, लोकप्रतिनिधींना व प्रतिष्ठीत व्यक्तींना सुपूर्त करण्यात आले. सदर माबि चळवळीची उद्दिष्टे, कार्यप्रणाली आणि भविष्यातील राष्ट्र आणि पर्यावरण हिताच्या गोष्टी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना अवगत करून देण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षितेच्या दृष्टीने ही चळवळ, हा विचार किती महत्त्वाचा आहे आणि सरकारने लोकसहभागातून या जैविक दहशदवादाला आपल्या राष्ट्रातून कसे हद्दपार करता येईल, त्याचे कसे समूळ उच्चाटन करता येईल याबाबत मंत्री महोदयांना थोडक्यात सूचित करण्यात आले. सन्माननीय गृहमंत्र्यांनी देखील या चळवळीच्या विचारधारेचे, कार्यप्रणालीचे कौतुक केले व देशभरात हा विचार शासकीय यंत्रणेतून व लोकसहभागातून सर्वदूर करणे गरजेचे आहे असे म्हणून चळवळीला, या राष्ट्रहिताच्या अभियानाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.

निश्चितच या भेटीमुळे माबि चळवळीला बळ आणि उर्जा मिळाली आहे. शिवपुण्यतिथीदिनी सदर माबिच्या कृतीमुळे छत्रपती शिवरायांना, त्यांच्या आणि सहकारी मावळ्यांच्या विचारांना, भूमिकेला खऱ्या अर्थाने अभिवादन ठरले असे म्हणले तरी ते वावगे ठरणार नाही. शक्तीचे प्रतिक असणाऱ्या श्री क्षेत्र रायगड या हिंदवी स्वराज्याच्या द्वितीय राजधानीत भक्तीचे प्रतिक असणाऱ्या श्री क्षेत्र आळंदी येथील अजानवृक्षाचे – शांभवीचे रोपण श्री जगदीश्वर व श्री शिरकाई मंदिरात विधिवत पूजन करून मंदिर-शिवसमाधी परिसरात करण्यात आले हे ही विशेष. जणू शक्ती आणि भक्तीचा हा सुरेख संगमच…!

याप्रसंगी माबि चळवळीचे व बायोस्फिअर्स संस्थेचे डॉ.सचिन अनिल पुणेकर, अशोक थोरात,अभिजित भसाळे,हिरकणीचे वंशज यशवंत रामचंद्र औकिरकर, रायगड मंडळाचे सहकार्यवाह योगेश भागवत, सागर देवरे- पाटील, शुभम जोगदंड आदींसह हरित कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading