भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यास महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे-खासदार प्रणिती शिंदे

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे

ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते, त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज : काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे

नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज – नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की,भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्या पासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत,आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत,पंतप्रधानांची सुद्धा भाषणे याच प्रकारची आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर, सरपंच संतोष देशमुख हत्या, महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत यावर सरकार काही करताना दिसत नाही. महाराष्ट्रातील सामाजिक संतुलन नष्ट करण्यासाठी लोकांचे लक्ष हटवण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत.शाहू,फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहेत. या महाराष्ट्रात लोकांना भडकवण्याचा, महाराष्ट्राची परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने करू नये.आज देशात अनेक प्रश्न आहेत त्यावर जनता उत्तर मागत आहे.काल मोदीजी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आली हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे.महाराजांच्या वेळी मणिपूर सारख्या घटना,महिला अत्याचार,शेतकरी आत्महत्या सारख्या घटना घडलेल्या नाहीत.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading