खाजगी कारखानदारीमध्ये इतर कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊस दर देण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच प्राधान्यता

आवताडे शुगरच्या गळीत हंगाम २०२४-२५ ची उत्साहात सांगता

पुढील गळीत हंगामामध्ये चालू वर्षापेक्षा अधिक जोमाने कारखाना चालवून जास्तीत जास्त ऊस गाळप करणार -कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सोमनाथ आवताडे

गळीत हंगाम २०२४-२५ सांगता समारंभ प्रसंगी उपस्थित संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे आदींसह मान्यवर…

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21/02/2025 – पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आवताडे शुगर अँड डिस्टलरीज प्रा.लि.नंदूर या साखर कारखान्याचा २०२४- २५ या हंगामाचा सांगता समारंभ संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे यांच्या हस्ते मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांचे उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाला.गळीत हंगाम सांगता समारंभानिमित्त शेतकी विभागाचे ॲग्री ओव्हरसियर संजय फटे व त्यांचे सुविद्य पत्नी सौ.भारती फटे यांचे हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली.

जिल्ह्यातील खाजगी कारखानदारीमध्ये इतर कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊस दर देण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच प्राधान्यता देण्यात आली आहे.आमदार समाधान आवताडे यांचे मार्गदर्शना खाली व चेअरमन संजय आवताडे यांचे नेतृत्वात सर्व अधिकारी व कर्मचारी याचे सहकार्याने कारखान्याने चालू गळीत हंगामा मध्ये ३,४२,३६३ मे.टन उसाचे गाळप केलेले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त ऊस गाळप करून त्यांना योग्य तो भाव देण्यासाठी कारखाना प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असते.पुढील गळीत हंगामामध्ये चालू वर्षापेक्षा अधिक जोमाने कारखाना चालवून जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचा मनोदय कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांनी व्यक्त करून चालू वर्षाचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सर्व खाते प्रमुख,अधिकारी, पदाधिकारी,कर्मचारी, ऊस वाहतुक ठेकेदार व ऊसतोड कामगार यांचे त्यांनी अभिनंदन करून सर्वांचे आभार मानले.

सदर गळीत हंगाम सांगता समारंभ प्रसंगी विक्रमी ऊस वाहतूक करणारे वाहतूकदार व उच्चाकी ऊस पुरवठादार शेतकऱ्याचा विष्णूपंत आवताडे यांच्या हस्ते कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे,माजी संचालक भारत निकम, सरव्यवस्थापक (टेक्नीकल) सुहास शिनगारे, दामाजी शुगरचे माजी संचालक संजय पवार, मरवडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवाजी पवार,दामाजीनगरचे माजी उपसरपंच सुहास पवार, बबनराव आवताडे पतसंस्थ संचालक दादा ओमने, जितीचे माजी सरपंच नंदू जाधव यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

ज्या वाहन ठेकेदारांनी जास्तीत जास्त ऊस वाहतुक करून कारखान्यास ऊस पुरवठा करणारे ट्रॅक्टर वाहन ठेकेदार सिद्ध महादेव ढगे,पैगंबर नबिसाब येड्रामी,संतोष लक्ष्मण सोलंनकर, बंडू काशिनाथ यादव व डंपिंग वाहन ठेकेदारामध्ये संभाजी बिरा लोखंडे, अंबादास पांडूरंग लवटे,मलकु पाराप्पा बंडगर, दीपक विठ्ठल व्हरे याचबरोबर विशेष उत्तेजनार्थ बक्षिस दामाजी शामराव बंडगर, दयानंद लक्ष्मण गरंडे,राजाराम तुकाराम मुकणे यांनी पुरवठा केल्याबद्दल त्यांचे कारखाना प्रशासनच्यावतीने शाल व श्रीफळ देवून सत्कार करून बक्षिस देण्यात आले.

ज्या ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपल्या कारखान्यावर पूर्ण विश्वास ठेवून आपले कारखान्यास उच्चांकी ऊस पाठवला त्या बापूराया रामगोंडा चौगुले सिद्धापूर, सौ. सुजाता संजय पवार घरनिकी,महादेव बयाजी व्होनमाने देवळे, दिलीप औदुंबर कोळी उच्चेठाण, विठ्ठल बाबुराव पाटील भंडारकवठे, नवनाथ गुरुनाथ आसबे तामदर्डी,राहुल शिवराम गिड्डे अर्धनारी,सागर आणासो खबाले सिद्धापूर, तानाजी हरिबा चव्हाण अरळी,महादेव आप्पासाहेब गुंड बठाण,संदेश राजकुमार पाटील विंचुर, चनगोंडा आण्णासाहेब बिरादार सिद्धापूर यांचेही कारखाना प्रशासनाच्यावतीने सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी डिस्टीलरी मॅनेजर संभाजी फाळके,चिफ केमिस्ट मोहन पवार,चिफ अकोंटंट बजीरंग जाधव,एच आर मॅनेजर डी. बी.बळवंतराव,शेती अधिकारी राहुल नागणे, उपशेती अधिकारी तोहीद शेख,ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे,ऊस विकास अधिकारी वैभव नागणे, ईडीपी मॅनेजर निलेश रणदिवे, केनयार्ड सुपरवायझर सुधाकर पाटील, प्रोडक्शन मॅनेजर अभिजित पवार,सुरक्षा अधिकारी चंद्रकांत राठोड, असि.सुरक्षा अधिकारी रणजीत पवार आदी मान्यवर सहकारी तसेच सर्व कारखाना प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, खाते प्रमुख, कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading