सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारचा महाराष्ट्रातील खासदारांनी केला निषेध

सोयाबीन ला योग्य खरेदी भाव तसेच सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारचा महाराष्ट्रातील खासदारांनी केला निषेध

नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज-महाराष्ट्रातील सोयाबीन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करत सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे,वर्षा गायकवाड,सुप्रिया सुळे,निलेश लंके,ओमराजे निंबाळकर यांच्यासह महाराष्ट्रातील खासदारांनी संसद भवन परिसरात निदर्शने करून निषेध केला.

यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोयाबीनचा सध्या बाजारभाव प्रति क्विंटल ४,३०० या किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी) खाली गेले आहेत, ज्यामुळे शेतकरी उत्पादन खर्च वसूल करू शकत नाहीत.ऊस खरेदीला उशीर आणि तातडीने मदत उपाययोजनांचा अभाव यामुळे संकट आणखी वाढले आहे, ऊस क्षेत्रातील समस्यांमुळे आधीच वाढलेल्या ग्रामीण भागातील संकटात आणखी भर पडली आहे.

सोयाबीनच्या घसरत्या किमतींमुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे असे म्हणत केंद्र सरकारच्या निष्क्रियतेवर टीका केली. वारंवार आवाहन करूनही सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे.सरकार योग्य भाव आणि वेळेवर खरेदी सुनिश्चित करण्यात अपयशी ठरल्याने शेतकऱ्यांना गंभीर आर्थिक अडचणीत आणले आहे.शेतकऱ्यांचे जीवनमान सुरक्षित करण्यासाठी त्यांनी किमान आधारभूत किंमतीवर तात्काळ खरेदी, कर्जमुक्ती उपाययोजना आणि शाश्वत किंमत स्थिरीकरण धोरण राबविण्याची मागणी केली

तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सतत उदासीन राहिल्यास गंभीर राजकीय परिणाम होऊ शकतात, असा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह इतर खासदारांनी दिली.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading