कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील तीन विद्यार्थींनींची ऑल इंडिया वेस्ट झोन क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत ऑल इंडिया वेस्ट झोन क्रिकेट स्पर्धेसाठी मुलींचा संघ निवडण्यात आला. यामध्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील तीन महिला खेळाडूंची निवड झाली आहे. यामध्ये १. पूजा चंद्रकांत माने -(इ. सी.एस भाग-३), २. प्रणाली संजय बेंद्रे -(इ.सी.एस भाग-२) व ३.अमृता देविदास आगावणे (बी.सी.ए. भाग-२) या महिला खेळाडूंचा समावेश आहे. या अंतर विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धा मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ उदयपूर राजस्थान येथे होणार आहेत.या स्पर्धेसाठी विविध राज्यातून 110 विद्यापीठ संघ सहभाग घेणार आहेत.या स्पर्धेसाठी आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा संघ सज्ज झाला आहे.

या निवड झालेल्या महिला खेळाडूंचे अभिनंदन प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे, उपप्राचार्य डॉ.भगवान नाईकनवरे,डॉ. तुकाराम अनंतकवळस, डॉ. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत,डॉ.अनिल चोपडे,डॉ.उमेश साळुंखे व महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, जिमखाना विभाग सदस्य,शिक्षक कर्मचारी यांनी केले. या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अनिल परमार,विठ्ठल फुले, मनोज खपाले यांचे मार्गदर्शन लाभले.
ही निवड कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयासाठी खूप अभिमानाची बाब असून या खेळाडूंना विद्यापीठ पातळीवर उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
