पंढरपूरचे डॉ शीतल शहा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत
कुरेश कॉन्फरन्सकडून डॉ शीतल शहा यांचा सत्कार
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच सन्मानीत झालेले पंढरपूरचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ शीतल शहा यांचा कुरेश कॉन्फरन्सच्यावतीने पंढरपूर येथे हृद्य सत्कार करणेत आला .
गेली ४ दशके पंढरपूर सारख्या निमशहरी, बालरुग्णांची अखंडीत, अविरत, निष्ठापूर्वक, श्रध्दा आणि ध्येयाने सेवा बजावणारे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ शीतल शहा यांना हैद्राबाद येथे राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.
हैद्राबाद येथील डॉक्टर्स असोशिएशन यांच्या वतीने डॉ शीतल शहा यांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला . नॅशनल मेडिकल असोशिएशन हैद्राबाद यांनी पंचतारांकीत हॉटेल येथे या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.देशभरातील सुमारे पाच हजार डॉक्टर या सोहळ्यात सहभागी झाले होते.देशातल्या अग्रगण्य ५० डॉक्टरांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत केले गेले त्यामध्ये डॉ शीतल शहा यांचा समावेश आहे.

हजारो बालकांसाठी देवदुत ठरलेले डॉ शीतल शहा यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्ली भारतच्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक आटपाडी यांच्या हस्ते आणि कुरेश कॉन्फरन्सचे पश्चिम महाराष्ट्राचे पदाधिकारी सर्वश्री माजी मुख्याध्यापक असिफ बेदरेकर सर, अझरभाई कमलीवाले, पंढरपूर मुस्लीम खाटीक समाजाचे अध्यक्ष जब्बार उस्ताद , उपाध्यक्ष इस्माईल नाडेवाले,कुरेश कॉन्फरन्सचे पंढरपूर तालुकाध्यक्ष रशिद शेख,कुरेश कॉन्फरन्सचे शहर अध्यक्ष मोहसीन नाडेवाले,मौलाना सलमान शेख, डॉ .सुधीर आसबे यांच्या उपस्थितीत शाल,पुष्पगुच्छ देत सत्कार करणेत आला.
बालरुग्णांची ४ दशके सेवा बजावणाऱ्या डॉ शीतल शहा यांनी निर्मळ,पारदर्शक वृत्तीने केलेल्या सेवेने राज्यासह, देशातील हजारो पालक त्यांच्याशी जोडले गेले आहेत.मी त्यांना गत ३३ वर्षापासून अगदी जवळून जाणतो आहे.सतत प्रसन्न,आनंदी आणि मृदु स्वभावाच्या डॉ शीतल शहा यांनी हजारो बालकांचे जीव वाचविण्यात मोठी भूमिका बजाविली आहे.या ईश्वरी सेवेच्या माध्यमातून त्यांनी हजारो बालकांना,पालकांना साक्षात श्री पांडुरंगाचेच आशीर्वाद मिळवून देण्याचे महान कार्य केल्याची भावना सादिक खाटीक यांनी डॉ शितल शहा यांच्या सत्कार प्रसंगी बोलून दाखविली.

Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
