भिमा कोरेगाव ऐतिहासिक विजयस्तंभ स्मारकासाठी 200 एकर जमीन व 200 कोटी निधीची तरतुद करा- केंद्रीय राज्यमंत्री आठवले

भिमा कोरेगाव ऐतिहासिक विजयस्तंभ स्मारकासाठी 200 एकर जमीन आणि 200 कोटी निधीची तरतुद करावी- केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले

मुंबई/पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज- भिमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी आंबेडकरी जनता दि.1जानेवारी रोजी विनम्र अभिवादन करते. देशभरातुन आंबेडकरी जनता भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यास एकत्र येते.यामुळे त्या स्मारक सभोवतालची 200 एकर ज़मिन ऐतिहासिक शौर्यस्तंभाच्या स्मारकासाठी देऊन २०० कोटी निधीची तरतुद महाराष्ट्र शासनाने करावी या मागणीसाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

पुणे येथील भिमा कोरेगाव येथील ऐतिहासीक विजय स्तंभास ना.रामदास आठवले यांनी १ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विनम्र अभिवादन केले.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ना.रामदास आठवले बोलत होते.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे,सरचिटणीस गौतम सोनावणे,संघटन सचिव परशुराम वाडेकर,सुर्यकांत वाघमारे,बाळासाहेब जानराव शैलेश चव्हाण, आशिष गांगुर्डे,मुंबईतुन आलेले प्रकाश जाधव,सोहेल शेख आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

१ जानेवारी १८१८ साली पेशव्यांच्या २८ हजार सैनिकांविरुध्द ५०० शुरविर महार सैनिकांनी प्रचंड घनघोर युध्द केले.त्यात ५०० महार सैनिकांनी पेशव्यांच्या २८ हजार सैनिकांचा दारुण पराभव केला.हे जगातलं फार मोठ आश्चर्य असून त्याबद्दल तत्कालीन ब्रिटीशांनी या भिमा कोरेगाव येथील या लढाईच्या स्मरणार्थ आणि महार सैनिकांच्या स्मरणार्थ त्यांच्या गौरवासाठी येथे विजयस्तंभ उभारला .या ऐतिहासिक विजय स्तंभाला दरवर्षी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर १ जानेवारी रोजी भिमा कोरेगावला येऊन या ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करुन आंबेडकरी समाजाला आपला गौरवशाली इतिहास हा लढाऊ योध्यांचा गौरवशाली इतिहास असल्याचे आठवण करुन देत.आपल्या पराक्रमी पूर्वजापासुन प्रेरणा घेऊन स्वाभिमानाने जगण्याचा उपदेश महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर देत असत.

भीमा कोरेगावची ऐकल्यानंतर शौर्यगाथा
आमचा उंच होतो आमचा माथा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आमचा दाता,
जो बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करेल त्याला घालू आम्ही लाथा,
भीमा कोरेगाव विजयस्तंभाला मी सलाम करतो जाता जाता.
अशा काव्यमय शब्दात ना.रामदास आठवले यांनी शूरवीर महार सैनिकांच्या पराक्रमाची विजय गाथेचा गौरव करताना कविता सादर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading