कारखाना वाचवण्यासाठी काय पण… चेअरमन अभिजीत पाटील abhijeet patil
विठ्ठल कारखाना वाचविण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार – चेअरमन अभिजीत पाटील
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०४/२०२४- विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी आज सोलापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विठ्ठल कारखान्याच्या अडचणी सांगितल्या. त्यातून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी अभिजीत पाटील वाटेल ती किंमत मोजण्यासाठी तयार आहे अशी प्रतिक्रिया अभिजीत पाटील यांनी याठिकाणी बोलताना व्यक्त केली.
शेतकरी सभासद जगला पाहिजे व सभासदांच्या संसाराशी राजकारण जोडून चालणार नाही अशी अभिजीत पाटील यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केली असता…. फडणवीस यांनी लवकरच यातून मार्ग काढू असा शब्द दिल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
