28 नोव्हेंबर रोजी सीताराम महाराज भंडारा नामसप्ताह
खर्डी /ज्ञानप्रवाह न्यूज/अमोल कुलकर्णी- पंढरपूर तालुक्यातील जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणारे खर्डी येथील श्री सीताराम महाराज यांची पुण्यतिथी कार्तिक वद्य त्रयोदशीला म्हणजे 28 नोव्हेंबर रोजी आहे. त्यानिमित्ताने नामसप्ताहचे आयोजन ग्रामस्थ व भाविकांनी केले आहे.

मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते. वार्षिक उत्सव असल्याने खेळणी,पाळणे हे बालचमूचे आकर्षण असते. दररोज नित्यपूजा व कीर्तन प्रवचन भजन आदी कार्यक्रम होत आहेत.समाधी मंदिर दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुरू आहे. येथील मंदिरात दर गुरुवारी व अमावस्येला हजारो भाविक येत असतात. तसेच वार्षिक पुण्यतिथी सोहळा भंडारासाठी लाखो भाविक येतात.दिवसातून दोन वेळा पूजा,आरती,नैवेद्य,हरिपाठ असा नित्यक्रम असतो.यासाठी समाधी मंदिर ट्रस्ट योग्य व्यवस्थापन करीत आहे.

यावेळी मुख्य विश्वस्त हरीभाऊ कुलकर्णी, अध्यक्ष दीपक रोंगे,बापू केसकर,विकास कुलकर्णी ,युरोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक आदींची बैठक झाली.हनुमान मंदिर पुजारी बाळासो मोकाशी,अमित मोकाशी आदींसह भाविक उपस्थित होते.पोलीस पाटील बालाजी रोंगे यांनी चोख बंदोबस्त ठेवणार असल्याचे सांगितले.यात्रा कालावधीत सांगोला पंढरपूर येथून विशेष बस गाड्यांची सोय केली आहे.यात्रेची सांगता अमावस्येला होणार असून 29 रोजी पालखी प्रदक्षिणा होईल.नंतर पालखी अक्कलकोट,गाणगापूर प्रस्थान ठेवणार आहे.
ग्रामपंचायतीच्यावतीने ग्राम स्वच्छता आरोग्य याची काळजी घेतली जात आहे. ग्रामविकास अधिकारी व्ही बी कुलकर्णी, सरपंच मनीषा भगवान सव्वाशे ,बंडुलाल पठाण, पाणी पुरवठा अण्णा कावरे प्रभू गायकवाड आदी परिश्रम घेत आहेत.

Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
