मुंबईच्या लोकल ट्रेनचे रूपांतर होणार एसी ट्रेनमध्ये

[ad_1]

local train mumbai
Mumbai News : मुंबईच्या लोकल ट्रेनचेपूर्णपणे एसी फ्लीटमध्ये वातानुकूलित ताफ्यात रूपांतर करण्याची महत्त्वाकांक्षी योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.ऑगस्ट 2022 पासून राजकीय विरोधामुळे रखडलेल्या या प्रकल्पाला भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि महायुतीचा राजकीय पाठिंबा मिळाल्यानंतर पुन्हा गती येऊ शकते.

 

मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई लोकल ट्रेनमधील एसी सेवा पूर्णपणे काढून टाकण्याची मागणी केली होती. सामान्य नोकरदार वर्गासाठी एसी लोकल गाड्या वापरणे अवघड असल्याचे ते म्हणाले. यानंतर मध्य रेल्वेने 10 नवीन एसी लोकल गाड्यांची सेवा बंद करून प्रकल्प तात्पुरता थांबवला होता. पण, आता भाजपच्या वाढत्या राजकीय पाठिंब्यामुळे ही योजना पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहे. एका भाजप नेत्याने सांगितले की- “राजकीय पाठिंब्याने या प्रकल्पाला नवीन बळ मिळाले आहे आणि आता तो वेगाने पुढे नेण्यात आला आहे.”

 

रेल्वे मंत्रालयाने 19 मे 2023 रोजी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) ला मुंबईच्या लोकल ट्रेन्सना 'वंदे मेट्रो' ट्रेनमध्ये अपग्रेड करण्याचा आदेश जारी केला. या प्रकल्पांतर्गत, मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) 3 आणि 3A अंतर्गत 238 वंदे मेट्रो गाड्या खरेदी केल्या जाणार आहे, ज्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे निधी उपलब्ध करून देतील.

 

या गाड्यांची निर्मिती 'मेक इन इंडिया' अंतर्गत करण्यात यावी, असे निर्देशही मंत्रालयाने दिले असून त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या आहे. मात्र, पण जुलै 2023 मध्ये या निविदा अचानक रद्द करण्यात आल्या आणि त्याचे कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. हे प्रकरण राजकीय पातळीवर अडकले असले तरी लवकरच ते मार्गी लागेल, असे रेल्वे बोर्डाच्या अधिकारींनी सांगितले.

 

रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकारींनी सांगितले की, मुंबईकरांना चांगल्या दर्जाच्या गाड्या हव्या असतील तर त्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागतील. गेल्या दहा वर्षांत भाड्यात कोणतीही वाढ झालेली नाही आणि लोकल ट्रेनचा प्रवास अजूनही सर्वात स्वस्त आणि वेगवान आहे.

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading