पुणे शहर शिवसेना महिला आघाडी तर्फे गणरायाला साकडं, एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री करा अशी केली प्रार्थना

पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्र राज्याची लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी गणरायाला महिला आघाडी तर्फे साकडे घालण्यात आलं आहे.

शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम ताई गोऱ्हे यांच्या संकल्पनेनुसार पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे आरती करण्यात आली.

यावेळी पुणे शहर महिला आघाडीच्या सहसंपर्कप्रमुख सुदर्शनाताई त्रिगुणाईत यांच्या नेतृत्वात महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महाआरती करीत गणरायाला प्रार्थना केली आहे.

यावेळी सुदर्शना त्रिगुनाईत सहसंपर्कप्रमुख यानी पुणे शहर जिल्हाच्यावतीने शैला पाचपुते, सुरेखा कदम पाटील, श्रद्धा शिंदे, सुप्रिया पाटेकर,मनीषा परांडे,हिराबाई आवळे,कविता शेवाळे, मंगल सोनटक्के, सुनिता उकिरडे,अक्षदा धुमाळ आदींसह सर्व शहर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
