महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील पुरूष, महिला व तृतीयपंथी यांच्या मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर
मुंबई / Team DGIPR,दि.२२ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या २८८ मतदारसंघांकरीता दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७ पुरूष, ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८ महिला तर १ हजार ८२० इतर मतदारांनी मतदान केले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

या निवडणुकीत झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रकाशित झाली आहे. यात प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांचा समावेश आहे. प्रत्यक्ष मतमोजणी करतांना टपाली मतदानाचा समावेश करण्यात येईल. त्याचप्रमाणे मतदान केंद्राध्यक्षाद्यारे भरण्यात आलेला १७ सी हा प्रत्यक्ष झालेल्या मतदानासंदर्भातील फॉर्म उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही देण्यात आला असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.

Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
