आचारसंहिता भंगाच्या १०१३४ तक्रारी निकाली; ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

आचारसंहिता भंगाच्या १०१३४ तक्रारी निकाली; ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई,दि.२०/११/२०२४: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण १० हजार १३९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १० हजार १३४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघना बाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोंबर पासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading