चंदूकाका सराफ पंढरपूर शाखेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10/11/2024 – चंदूकाका सराफ पंढरपूर शाखेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी चंदूकाका सराफ परिवाराचे चेअरमन किशोरकुमार शहा,संचालिका सौ नेहा किशोरकुमार शहा,सेल्स हेड दीपक वाबळे,HR मॅनेजर कुलदीप जगताप उपस्थित होते.

या कार्यक्रमाला कल्याण साळुंखे, सविता जैन,यशवंत मोहिते, सौ शैला सालविठ्ठल,सोमनाथ शिंदे,ओंकार तानवडे,सौ प्रियांका तानवडे, सचिन चव्हाण ,बिबीशन देशमुख, सौ उर्मिला देशमुख,श्री गवळी सर,सौ रुक्मिणी शिंदे ,सुलोचना स्वामी , डॉ.कुणाल मोरे सर, सचिन जगताप ,बाळू नीलते,सौ वैष्णवी जाधव, डॉ.मृणाल मोरे ,सौ सुचिता साळुंखे,आनंद कोठारी,रुजू कोठारी,हनुमंत भोसले सर ,सौ रजनी मॅडम ,सौ रोहिणी देशमुख,डॉ.प्राजक्ता देशमुख,केशव अभंगराव, जालिंदर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते .

प्रथम वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाप्रसंगी संचालिका सौ.नेहा भाभी शहा यांनी मार्गदर्शन केले.आलेल्या मान्यवरांना शाल श्रीफळ व वर्धापन दिनानिमित्त भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.दीपक वाबळे यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला पंढरपूर शाखेचे शाखा व्यवस्थापक दीपक चव्हाण, बंडू गोफणे, ऑपरेशन मॅनेजर अनिल वठारे , फ्लोअर इन्चार्ज संदीप पवार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत सावळे यांनी केले.या कार्यक्रमाचे व्यवस्थापन गणेश तोडकरी,सागर मोरे,विनायक पवार यांनी केले

Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
