कार्तिक वारी निमित्त चंद्रभागेच्या तीरावर महिला भाविकांसाठी 10 चेजिंग रूम

चंद्रभागेच्या तीरावर महिला भाविकांसाठी 10 चेजिंग रूम

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.08- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीकडून मुबलक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विठूरायाचे दर्शन घेण्यापूर्वी अनेक भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करतात.महिला भाविकांसाठी चंद्रभागा वाळवंटात स्नान केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी 10 चेंजिंग रूमची उभारणी करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

दिनांक 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा संपन्न होत आहे.त्याआधी वारकरी आणि भाविक श्री क्षेत्र पंढरपुरात दाखल होत आहेत. वारीला येणारे बहुतेक सर्व भाविक विठूरायाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करीत असतात. सदर ठिकाणी महिला भाविकांना कपडे बदलण्याची सोय करण्याच्या दृष्टीने चंद्रभागा नदीपात्रात 10 ठिकाणी चेजिंग रूम बसविण्यात आलेल्या आहेत. याशिवाय, महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने चेंजिंग रूमजवळ 24 तास महिला सुरक्षा कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या चेंजिंग रूमद्वारे एका वेळेस 30 ते 40 महिला भाविक कपडे बदलू शकतात.

दर्शनरांगेत 4 ठिकाणी हिरकणी कक्षाची उभारणी

कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप, पत्राशेड व श्री विठ्ठल सभामंडप येथे 4 ठिकाणी हिरकणी कक्षाची (स्तनपान गृह) उभारणी करण्यात आली आहे.दर्शनमंडप येथे सॅनिटरी नॅपकीनची देखील उपलब्धता करण्यात आली असून श्रींच्या दर्शन रांगेत महिला भाविकांच्या सुरक्षततेच्या दृष्टीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त मंदिर समिती मार्फत महिला स्वयंसेवक नियुक्त करण्यात आलेले आहेत. या यात्रेला येणा-या सर्व वारकरी भाविकांची सेवा करण्यास मंदिर प्रशासन सदैव तत्पर असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading