आता शेवटचे दिवस मोजा, खासदार पप्पू यादवांना पुन्हा धमकी

[ad_1]

Pappu Yadav
Pappu Yadav News : पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. पप्पू यादवच्या पीएला व्हॉट्सॲप चॅटद्वारे धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. पप्पू यादवच्या पीएला व्हॉट्सॲप चॅटद्वारे धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पीएने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.  

 

तसेच खासदाराच्या पीएने सांगितले की, खासदाराला व्हॉट्सॲपवर धमकी देण्यात आली होती. व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉटही त्याने शेअर केला आहे. व व्हायरल होत आहे. मेसेज पाठवणाऱ्या आणि कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे सांगितले आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने पप्पू यादवला सांगितले की, आता तुमचे शेवटचे दिवस मोजा. तुम्हाला मारण्यासाठी सहा जणांना सुपारी देण्यात आली आहे. पण, धमकी देणार्याने त्या सहा जणांची नावे उघड केली नाहीत. खासदारांच्या पीएच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading