श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास राजेंद्र गुजर या भाविकांकडून 1 लाखाची देणगी

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास राजेंद्र गुजर या भाविकांकडून 1 लाख रूपयाची देणगी

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास हुतात्मा जवान मेजर श्रीराम राजेंद्र गुजर यांचे स्मरणार्थ राजेंद्र संतोष गुजर,धानोरे जि.नाशिक या भाविकाने 1 लाख 100 रूपयांची देणगी दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

दि.06 नोव्हेंबर रोजी गुजर दांपत्य आपल्या मुलीच्या विवाह समारंभाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी व श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पंढरपूरला आले असता, त्यांनी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस दान दिले आहे. त्याचा 24 वर्षीय मुलगा भारतीय सैन्य दलात कार्यरत होता परंतू सुट्टीवर गावी आले असता मागील वर्षी अपघातात दुर्दैवी निधन झाले होते.आपल्या मुलाच्या स्मरणार्थ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दान द्यावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती.

या दानशुर देणगीदाराचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी देणगी विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे उपस्थित होते. देणगीदार भाविक श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे भक्त असून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धानोरे येथील रहिवाशी आहेत.

कार्तिकी यात्रा कालावधी सुरू असल्याने भाविकांची दर्शनरांगेत गर्दी वाढत आहे. या भाविकांना मंदिर समितीस दान देण्यासाठी कायमस्वरूपी स्टॉल व्यतिरिक्त जादा स्टॉलची उभारणी करण्यात आली असून, क्यूआर कोड,आरटीजीएसद्वारे देणगी देण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, श्री संत तुकाराम भवन येथील देणगी कार्यालयात समक्ष उपस्थित राहून किंवा मंदिर समितीच्या https://vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने देणगी देता येईल असे लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांनी सांगितले.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading