कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०४/११/२०२४ – कार्तिकी यात्रा दरवर्षी प्रबोधिनी शुध्द एकादशी या दिवशी भरते. सन 2024 यावर्षी कार्तिकी यात्रा दिनांक 12 नोव्हेंबर रोजी आहे. या यात्रेचा कालावधी दि.02 ते 15 नोव्हेंबर असा राहणार आहे. या यात्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दरवर्षी कार्तिकी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.

 दिनांक 04 नोव्हेंबर रोजी चांगला दिवस असल्याने विधिवत पुजा करून सकाळी 7.30 वाजता श्रींचा पलंग काढण्यात आला असून विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड व रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे.त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे 24 तास मुखदर्शन,तर 22.15 तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते.

श्रींचा पलंग काढण्यात आल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इ. राजोपचार बंद होवून पहाटे 4.00 ते 5.00 या वेळेत नित्यपुजा, सकाळी 10.45 ते 11.15 पर्यंत महानैवेद्य व रात्री 8.30 ते 9.00 या वेळेत लिंबूपाणी / गंधाक्षता हे राजोपचार सुरू ठेवण्यात येत आहेत. दिनांक 04 ते 20 नोव्हेंबर (प्रक्षाळपुजा) पर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध राहील. कार्तिकी यात्रेला सुरवात झाली असून, भाविकांची दर्शनरांगेत गर्दी वाढत आहे. परंपरेनुसार 24 तास दर्शन सुरू करण्यात आल्याने जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे दर्शन होणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading