वसंतराव काळे आय.टी.आय.च्या प्रशिक्षणार्थी शासकीय व खाजगी आय.टी.आय मधून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/१०/२०२४- पंढरपूर येथील वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वीजतंत्री या व्यवसाय ट्रेड मधील प्रशिक्षणार्थी यांनी सन 2023-24 अखिल भारतीय व्यावसाय परीक्षेत सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक संपादन केला.
यामध्ये शुभम रामचंद्र मोरे वीजतंत्र ट्रेड यांनी 98% गुण संपादन करून सोलापूर जिल्ह्या मध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर जयदीप नितीन पवार वीजतंत्री या ट्रेड मधील प्रशिक्षणार्थ्यानी 97.67% मार्क संपादन करून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांक वरद विलास शिंदे वीजतंत्री या ट्रेड मधील प्रशिक्षणार्थी यांनी 97.5% गुण संपादन केले आहेत.

सोलापूर जिल्ह्यामध्ये शासकीय व खाजगी आय.टी.आय मधून वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वीजतंत्री या व्यवसाय ट्रेड मधील प्रशिक्षणार्थीनी प्रथम,द्वितीय व तृतीय असे तीनही क्रमांक संपादन करून यश मिळवले आहे. या प्रशिक्षणार्थ्यांना निदेशक विक्रम पिसे सर यांनी विशेष मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्याण काळे यांच्या शुभहस्ते प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आय.टी.आय.चे प्राचार्य संतोष गुळवे सर,रणजित जगताप,निदेशक विक्रम पिसे सर , अनिल ननवरे सर, अमोल आयरे सर, संतोष सुरवसे सर,अनिल जाधव सर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
