[ad_1]

तामिळनाडूमधील तिरुवोटीयुर येथील मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात संशयास्पद रासायनिक गळती झाल्यामुळे काही विद्यार्थी आजारी पडले असून तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली असून काही विद्यार्थ्यांनी श्वास घेण्यास त्रास होणे आणि डोळ्यात जळजळ होणे इत्यादी तक्रारी केल्या. इतर अनेक विद्यार्थ्यांनी मळमळ होत असल्याची तक्रार केली. यानंतर शाळेत एकच गोंधळ उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार एका विद्यार्थ्याने सांगितले की, “आमच्यापैकी काहींना श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे ताजी हवा घेण्यासाठी वर्गाबाहेर पळावे लागले.” आमच्या शिक्षकांनाही श्वास घ्यायला त्रास होत होता. काही विद्यार्थी बेशुद्धही झाले होते, पण आमच्या शिक्षकांनी त्यांना पुन्हा शुद्धीवर आणले.
अनेक विद्यार्थ्यांना गुदमरल्यासारखे वाटल्यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाला रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तसेच पालकांनीही शाळेत पोहोचलेल्या वर आपल्या मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
रसायनाची गळती शाळेतून झाली की रासायनिक कारखाना मधून झाली हे अजून स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
Edited By- Dhanashri Naik
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
