माजी नगरसेवक नाना बागुल आणि सिंधी समाजाचे नेते नंदलाल वाधवा यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.18 – आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक नाना बागुल यांनी आज आपल्या समर्थकांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) या पक्षात आज जाहिर प्रवेश केला.तसेच सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते नंदलाल वाधवा यांनी ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षात जाहिर प्रवेश केल्याची अधिकृत घोषणा आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर,रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ,ठाणे प्रदेश निरिक्षक सुरेश बारशिंग, युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे, प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे, महिला आघाडी राज्य अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे , उषाताई रमलू ,आशाताई लांडगे,अभयाताई सोनवणे, माजी नगरसेवक नाना बागुल, सिंधी समाज ज्येष्ठ नेते नंदलाल वाधवा आदि उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते माजी नगरसेवक नाना बागुल आणि नंदलाल वाधवा यांचे पुष्पगुच्छ देऊन रिपब्लिकन पक्षात स्वागत करण्यात आले.
माजी नगरसेवक नाना बागुल हे उल्हासनगर मधील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आहेत.त्यांच्या कुटुंबात त्यांच्या पत्नी आणि मुलगा नगरसेवक आहेत.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर आपला अतुट विश्वास असल्याने आपण रिपब्लिकन पक्षात जाहिर प्रवेश केल्याचे मनोगत नाना बागुल यांनी व्यक्त केले.
माजी नगरसेवक नाना बागुल आणि नंदलाल वाधवा यांच्या पक्ष प्रवेशामुळे उल्हासनगर आणि ठाणे प्रदेश मध्ये रिपब्लिकन पक्षाला बळकटी मिळेल असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
