सोलापूर लोकसभा मतदारसंघ नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर, चिंचोळी काटी गावभेट दौरा

सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.16 ऑक्टोंबर 2024- लोकसभा निवडणुकीत मतदारांनी प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर, चिंचोळी काटी या गावांना भेट देऊन त्या गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.

नागरिक,शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.यावेळी मान्यवर नेतेमंडळी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
