[ad_1]

रायगड जिल्ह्यात बस 50 फूट खाली कोसळल्याने 19 महिला जखमी झाल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात बुधवारी 'लाडकी बहीण' कार्यक्रमासाठी महिलांना घेऊन जाणारी सरकारी बस 50 फूट खाली कोसळल्याने 19 महिला प्रवाशांसह किमान 20 जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) भिवंडी आगारची बस, 29 महिलांना घेऊन, जात होती. साधारण दुपारी माणगाव तहसीलमध्ये या बसला अपघात झाला, असे एका अधिकारींनी सांगितले.
महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात माणगाव येथे आयोजित कार्यक्रमात नेले जात होते, ज्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. बस कुमशेत गावात येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस सुमारे 50 फूट खाली कोसळली.
Edited By- Dhanashri Naik
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
