अहिंसा पतसंस्था हि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था – मिहीर गांधी
मिहीर भाईंची महाराष्ट्र राज्य जैन तीर्थक्षेत्र कमिटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड याचा प्रत्येकास अभिमान -नितीन दोशी
म्हसवड / ज्ञानप्रवाह न्यूज – म्हसवड ता. माण जि.सातारा येथील अहिंसा पतसंस्था हि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात नावाजलेली पतसंस्था आहे, असे विधान सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष व जैन तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र राज्याचे नूतन अध्यक्ष मिहीर गांधी यांनी काढले.

ते पुढे म्हणाले अहिंसा पतसंस्था हि सन्मती सेवा दलाचा एक भागच आहे असे आम्ही समजतो तसेच म्हसवड येथील अहिंसा पतसंस्था व माळशिरस येथील रत्नत्रय आणि चंद्रप्रभू या पतसंस्था म्हणजे जैन समाजाचे भूषण आहेत.

म्हसवड येथील अहिंसा पतसंस्थेमध्ये जैन तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी मिहिर गांधी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.

या सत्कार कार्यक्रमप्रसंगी म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितिन दोशी म्हणाले की, मिहीर गांधी यांनी सन्मती सेवा दलाच्या माध्यमातून तरुणांची संघटना उभा करून गेली 25 वर्षे सातत्याने जैन समाजातील अनेकविध प्रश्न मार्गी लावले. मिहीर भाईंना नेमकेपणाने कोठे पाठपुरावा केला म्हणजे प्रश्न सुटेल याची चांगली जाण आहे. त्यांनी आत्तापर्यंत मंदिर जीर्णोद्धार, मुनीसेवा, त्यागी निवास, विविध धार्मिक कार्यक्रम, रुग्णसेवा, वधुवर मेळावा, सम्मेद शिखरजी तीर्थयात्रा व तेथे स्वछता मोहीम अशा समजोपयोगी योजना राबवून संपूर्ण देशात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे.मिहीर भाईंची महाराष्ट्र राज्य जैन तीर्थक्षेत्र कमिटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली याचा प्रत्येकास अभिमान आहे. त्यांच्या हातून अशीच नेत्रदीपक कार्य व्हावे अशी सदिच्छा व्यक्त केली.

या कार्यक्रम प्रसंगी सन्मती सेवा दलाचे नीरज व्होरा, सन्मती सेवा दलाचे माजी अध्यक्ष डॉ.राजेश शहा,माणदेशी फाउंडेशन चे उपाध्यक्ष जवाहर देशमाने,जैन मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष महावीर व्होरा यांनी मनोगत व्यक्त केले.

उपाध्यक्ष तेजस गांधी, स्वराज गांधी, सचिन देशमाने , शशिकिरण देशमाने, भारतीय जैन संघाचे प्रवीण दोशी, जैन मंदिर समितीचे ट्रस्टी संतोष दोशी,अहिंसा पतसंस्थेचे व्हा. चेअरमन अजितकुमार व्होरा,अनिल देशमाने, जैन मंदिराचे पंडितजी, जितेंद्र गांधी, यशोधर व्होरा, राजेश दोशी, कुमार तिवाटणे तसेच संस्थेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले.

Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
