श्री माताजी निर्मलादेवी प्राथ.उच्च प्राथमिक विद्या मंदिर, पंढरपूर येथे योद्धा गुरुकुल फाउंडेशनतर्फे मुल व मुलींना स्वसंरक्षणाचे दिले प्रात्यक्षिक

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०९/२०२४- श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथ.उच्च प्राथमिक विद्या मंदिर,पंढरपूर येथे आज योद्धा गुरुकुल फाउंडेशनतर्फे योगेश भोसले सर,पृथ्वीजीत कांबळे सर यांनी मुल व मुलींना स्वसंरक्षण कसे करावे याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखवले.

आज सर्वांना आपल्या स्वतःच्या संरक्षणाची गरज आहे. जीवनात कॊणताही वाईट प्रसंग आला तरी धाडसाने सामोरे जाऊन लढणे गरजेचे आहे.माणसाचं मन आणि मनगट बलशाली असल्यास कोणत्याही प्रसंगाचा सामना करू शकतो, असे योगेश भोसले सर म्हणाले.

आजच्या सरावात इ.१ ली ते ७ वी विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षणाचे धडे घेतले आणि सरावामध्ये ७ वी च्या वर्गातील मुलींनी भाग घेतला.

मुख्याध्यापक संतोष कवडे सर म्हणाले,आज आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा मित्रांसोबत शाळेत किंवा खेळात दुरुपयोग करू नका. गरज असल्यावरच कठीण प्रसंगी याचा वापर करावा.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश भोसले सर, अश्पाक मुजावर सर,दिनेश आगावणे सर, दीपक टापरे सर,सौ.जयश्री खडतरे मॅडम, सौ.राणी गावडे मॅडम यांनी प्रयत्न केले.या कार्यक्रमाचे आभार महेश भोसले सर यांनी मानले.

Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
